farmers-7592.jpg 
नाशिक

हा तर अन्यायच! पाटबंधारेला मदत करूनही शेतकऱ्यांवरच गुन्हे; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

रोशन खैरनार

नाशिक : (सटाणा) गेल्या २५ वर्षांपासून या पाझर तलावाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचाच बळी घेणाऱ्या पाटबंधारे विभागावरच गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जायखेडा पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा संतप्त रयत क्रांती संघटनेने सोमवारी (ता. १९) निवेदनाद्वारे दिला. 

बेमुदत उपोषणाचा रयत क्रांती संघटनेचा इशारा 

याबाबत संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात, गेल्या २५ वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे तळवाडे भामेर (ता. बागलाण) येथील पाझर तलावाकडे दुर्लक्ष असून, तलावाच्या मोरीची (गेट) दुरुस्तीही केलेली नाही. नादुरुस्त मोरी (गेट) व मातीबांधावर मोठमोठी झाडे वाढले आहेत. सध्या तळवाडे भामेर पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असताना तलावातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी नादुरुस्त गेट उघडत नसल्याने पाटबंधारे विभागाने धरणाचा सांडवा तोडून पाणी धाबळू नाल्यात (उत्राणे) सोडण्याच्या तयारीत होते. या नाल्याची वहनक्षमता कमी असून, तलावाचे पाणी सोडल्यास आमची शेती, विहीर आणि शेतातल्या जनावरांच्या जीविताला मोठा धोका आहे. त्यामुळे या नाल्यात पाणी सोडू नये, अशी विनंती शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली. 

शेतकऱ्यांवर दादागिरीने गुन्हे दाखल

शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता पाटबंधारे विभागाने स्वतःची चुकी झाकण्यासाठी काशीनाथ संपत गायकवाड, किरण काशीनाथ गायकवाड, दिलीप काशीनाथ गायकवाड (रा. तळवाडे भामेर) या मदत करणाऱ्या शेतकऱ्यांवर दादागिरीने गुन्हे दाखल केल्याने त्यांना अटक झाली. हे अन्यायकारक आहे. पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे निवेदनात म्हटले असून, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हा सरचिटणीस डोंगर पगार, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ अहिरे, तालुकाध्यक्ष युवराज देवरे, भाऊसाहेब पगार, भिका धोंडगे, हिंमत धोंडगे, संदीप कापडणीस आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT