company 123.jpg
company 123.jpg 
नाशिक

धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशीही दोन कंपनी व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा... चक्क ६० कामगार कोरोना बाधित

संदीप मोगल

नाशिक / लखमापूर : कंपनीमधील ४७ कामगार कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पोलिस यंत्रणा यांनी कंपनी व्यवस्थापनाला सूचना दिली होती. मात्र व्यवस्थापनाने हलगर्जी केल्याने सुमारे ६० कामगार बाधित झाले. शासनाच्या नियम-आदेशाचे पालन न करता हयगय केली.

नियम-आदेशाचे पालन धाब्यावर

मानवी औषधे बनविणाऱ्या कंपनीत १२ कामगार व सिमेंट पत्रे तयार करणाऱ्या कंपनीमधील ४७ कामगार कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पोलिस यंत्रणा यांनी कंपनी व्यवस्थापनाला सूचना दिली होती. मात्र व्यवस्थापनाने हलगर्जी केल्याने सुमारे ६० कामगार बाधित झाले. शासनाच्या नियम-आदेशाचे पालन न करता हयगय करत संक्रमण वाढण्यास जबाबदार धरत व्यवस्थापक जब्बार पठाण व विजेंद्र बाबू तसेच दुसऱ्या कंपनीतील व्यवस्थापकाविरोधात साथरोग प्रतिबंध, कोविड-१९ उपाययोजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. लखमापूर येथील ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 

वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लखमापूर (ता. दिंडोरी) येथील एमआयडीसीतील दोन कंपन्यांत कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रिपोर्ट - संदीप मोगल

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT