criminal Arrested for molesting and beating girl nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : अत्याचाराच्या गुन्हयात शिक्षा भोगून आलेल्या नराधमाकडून युवतीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : तळोशी येथील रहिवासी युवती व तिची बहीण घोटी येथे बाजारासाठी पायी जात असताना तळोशी येथील चांगदेव (दिलीप ) शेळके याने तिचा पाठलाग करून तिला मारहाण करीत तिची छेड काढली, अज्ञातस्थळी नेत विनयभंग केला.

याप्रकऱणी पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. संबंधित तरूण गुंड प्रवृत्तीचा असून नुकताच बलात्काराच्या गुन्हयात शिक्षा भोगून आलेला आहे. (criminal Arrested for molesting and beating girl nashik crime news)

संबंधित तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तत्काळ दखल घेत कार्यवाही केली. या घटनेतील संशयित चांगदेव उर्फ दिलीप तुकाराम शेळके (२६, वर्षे रा. तळोशी) याला अटक केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी (ता.१८) फिर्यादी व तिची बहीण तळोशी येथून घोटी येथे बाजारासाठी जात असताना चांगदेव (दिलीप) शेळके हा पाठलाग करत असल्याने माझ्या बहिणीने पाठलाग का करतो असे विचारले असता चांगदेव शेळके याने तळोशी शिवारात नदीवरील पुलानंतर घोटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बहिणीला शिविगाळ करून मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तिचे डोक्याचे केसं धरून खाली पाडून चांगदेव याने दोन्ही हाताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. आम्हा तिघां बहिणींना चांगदेव शेळके सतत त्रास देत असल्याने आमचे जगणे कठीण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी शेळके यास बलात्काराच्या गुन्हयात शिक्षा झाली होती, मात्र तुरूंगातुन सुटून आल्यानंतर तो सतत आम्हा तिघां बहिणींना त्रास देत आहे. त्याने माझ्या बहिणीचा विनयभंग केला. त्याच्यापासून आमच्या जिवाला धोका आहे. पोलिसांनी नराधमास कठोर शिक्षा द्यावी असे फिर्यादित म्हटले आहे.

दरम्यान गावात मोलमजुरी करून जगणाऱ्या महिला, मुलींना अशा गावगुंडापासून त्रास होत असल्याने पोलिस प्रशासनाने त्याला हद्दपार करून कठोर शिक्षा द्यावी व महिला, मुलींची सुरक्षा करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT