Gangapur police station team with arrested Attal house burglars and confiscated items esakal
नाशिक

Nashik Crime: अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या; चोरीचे लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : गंगापूर रोड हद्दीतील शिवाजीनगरमध्ये बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल घरफोड्या करणाऱ्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सव्वा लाखांच्या चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. महेश बळिराम शिरसाठ (रा. गोवर्धन, गंगापुर गांव, नाशिक. ह.मु पुणे) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल घरफोड्या संशयिताचे नाव आहे. (criminal house burglary arrested Stolen laptops smart TVs seized Nashik Crime)

देवानंद समाधान गिरी (रा. शिवाजीनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या ६ ते ७ तारखेदरम्यान ते बाहेरगावी गेले असताना अज्ञात संशयितांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व एलईडी टीव्ही असा २५ हजारांचा ऐवज चोरून नेला होता.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस नाईक रवींद्र मोहिते यांना अट्टल घरफोड्या पुन्हा शिवाजी नगर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे हवालदार राजेंद्र घुमरे, चंद्रकांत गवळी, सोमनाथ शार्दुल, गंगापुर पोलिस ठाणेचे रात्रीचे गस्ती पथकाचे गिरीष महाले, सोनू खाडे, गोरख सांळुखे शिवाजीनगर, कार्बन नाका परिसरात सापळा रचला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अट्टल घरफोड्या महेश बळिराम शिरसाठ (रा. गोवर्धन, गंगापुर गांव, नाशिक. ह.मु पुणे) यास शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दोन घरफोड्यांची गुन्हयाची कबुली दिली.

त्याच्याकडून १० हजाराचा टिव्ही, २५ हजाराचा संगणक , ५० हजारांचा लॅपटॉप, ३५ हजारांचा टीव्ही, असा १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हेशाखेचे उपायुकत प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, मिलिंद परदेशी, मच्छिंद्र वाकचौरे, सुजित जाधव, चालक थवील, तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलावडे, राजेंद्र घुमरे, चंद्रकांत गवळी, सोमनाथ शार्दुल यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT