Insurgents detained during combing operation in circle two. In the second photo, the illegal liquor stock and the suspect were seized in the suburbs. esakal
नाशिक

Nashik Crime News : परिमंडळ दोनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन; सराईत गुन्हेगारांची धरपकड

पोलिस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ दोनमध्ये पुन्हा टवाळखोरांनी डोके वर काढल्याने, आगामी महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पोलिस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ दोनमध्ये पुन्हा टवाळखोरांनी डोके वर काढल्याने, आगामी महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

यादरम्यान पोलिस ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात येऊन १७२ टवाळखोरांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. (Criminals nabbed during combing operation Sarai in circle two nashik crime news)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी यांनी अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

अचानक राबविण्यात आलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचे धाबे दणाणले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी रेकॉर्डवरील १२३ सराईत गुन्हेगारांची तपासणी करून कारवाई करण्यात आली. तर, १७२ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांच्या घरझडतीमध्ये धारदार हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना वैदूवाडीत देशी-विदेशी बनावट दारुची अवैधरीत्या विक्री करताना शंकर गुरू लोखंडे (३७, रा. वैदूवाडी, समतानगर, आगार टाकळी) यास उपनगर पोलिसांनी अटक केली.

त्याच्याकडून ६ हजार ३९० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांच्यासह पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT