manmad talathi ofc.jpg 
नाशिक

'साहब हमारा नाम लिखवा लो, गाव जाने का हैं!...घरच्या ओढीने 'त्यांचा' जीव कासावीस...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मनमाड) "हमको जाने दो हमारे गाव, अब यहॉं जी नहीं लग रहा हैं... घरवालो की याद आ रही है... साब हमारा नाम लिखवा लो... हमे गाव जाने का है,' हे सुन्न करणारे शब्द आहेत लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीयांचे... मनमाड शहरात पाणीपुरीपासून ते बिगारी काम करणारे कामगार घरच्या ओढीने कासावीस झाले आहेत. नाव लिहिण्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी झुंबड उडाली होती.

स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत नावनोंदणीची व्यवस्था

आपल्या राज्यात जाण्याच्या ओढीने परप्रांतीय नागरिक उन्हात रांगेत उभे होते. हाताला काम नसलेले परप्रांतीय कामगारच नव्हे, तर राज्यात इतर ठिकाणी अडकलेल्या नागरिकांनाही आपल्या गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. लॉकडाउनमुळे अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांसाठी सरकारने आता विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था काही अटी आणि शर्थींसह सुरू केली आहे. त्यामुळे शहरातून परराज्यात रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत नावनोंदणीची व्यवस्था केली आहे. आपल्या राज्यात सर्वांत आधी जाण्यासाठी वर्णी लागावी, यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना आदी राज्यांमधील कामगारांनी नावनोंदणी सुरू केली आहे. शेकडो नागरिक नावनोंदणी करीत आहेत. आधारकार्ड, पत्ता, राज्य, मोबाईल क्रमांक घेतले जात आहेत. तलाठ्याकडे प्रवास करण्यास इच्छुक असणाऱ्यांची यादी दिवसाला वाढत आहे. 

कामगारांना गावी परतण्याचे वेध

शहरातील शेकडोच्या वर अधिक नागरिकांनी गावी जाण्यासाठी नावे नोंदविली आहेत. लॉकडाउन सुरू असल्यापासून परप्रांतीय मजूर, कामगारांना गावी परतण्याचे वेध लागले आहेत. अनेकांनी पायीच परतीचा रस्ता धरला आहे. अडकलेल्या मजुरांच्या व्यथा पाहता, त्यांना गावी जाण्यासाठी सरकार मुभा देणार असल्याचे कळताच या नागरिकांना हायसे वाटले. आपल्याला प्रवासाचा पास मिळावा, यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी केली होती. वरिष्ठ स्तरावरून आदेश आले की यांची वैद्यकीय तपासणी करून पाठविले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT