Yeola Vaccination Center
Yeola Vaccination Center Sakal
नाशिक

दोनशे लसींसाठी भरली पाचशेवर नागरिकांची जत्रा!

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी नेमकी कुणासाठी व केव्हा करणार, यांसह अनेक प्रश्‍‍न नागरिकांना असल्याने शनिवारी (ता. ८) येथे लसीकरणासाठी (Vaccination) जणू यात्राच भरली होती. केवळ दोनशे लसी उपलब्ध असताना तब्बल ४०० ते ५०० नागरिकांनी गर्दी केल्याने आजही पोलिसांच्या उपस्थितीत लसीकरण करावे लागले. (crowd of citizens had gathered at Yeola for vaccination)


कोरोना लसीकरणासाठी नागरिक दोन दिवसांपासून चकरा मारत असून, अनेक ज्येष्ठ नागरिक पहाटेपासूनच लसीकरणासाठी नंबर लावत आहेत. मात्र, लस उपलब्ध नाही. आज तुम्हाला दिली जाणार नाही, असे नानाविध कारणे सांगून ज्येष्ठ इतर नागरिकांना माघारी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे लस कधी मिळणार अन्‌ लसीसाठी किती चकरा माराव्या लागणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे कोरोना लसीकरण आजपासून स्वामी मुक्तानंद विद्यालयात करण्यात आले. येथे शनिवारी ऑनलाइन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील ६७ नागरिकांनी लस घेतली. तर ४५ पुढील १०० नागरिकांना लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. लसीकरण गर्दी न होता सुरळीतपणे करण्यात यावे, यासाठी स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या आवारात लसीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

शनिवारी (ता. ८) दोन्ही गटांसाठी प्रत्येकी १०० अशा २०० लसी उपलब्ध होत्या. १८ ते ४४ वयोगटातील ६७ नागरिक लसीकरणासाठी उपस्थित होते. ऑनलाइन नोंदणी केलेल्या; परंतु लसीकरणासाठी उपस्थित नसलेल्या नागरिकांना संपर्क करण्यात येऊन बोलावण्यात आले. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ४५ व त्यापुढील नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक नसल्याने या वयोगटातील नागरिकांची लसीकरण केंद्रासमोर गर्दी होत आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठीही नियोजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

येथे लसीकरणासाठी तोबा गर्दी होत असून ज्यांनी ऑनलाइन नावनोंदणी केलेली नाही, असे नागरिकच गर्दी करत असल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. १८ ते ४४ वयोगटातील ऑनलाइन नोंदणी केलेल्या १०० नागरिकांनाच लस दिली जाईल. त्यामुळे नोंदणी न करता कुणीही येऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने करूनही नागरिक गर्दी करत आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे पूर्णवेळ लसीकरण केंद्रावर उपस्थित होते. तर शहर पोलिसांचा बंदोबस्त चोख होता. नगरसेवक प्रमोद सस्कर, धीरज परदेशी, मनोज दिवटे, योगेश सोनवणे, सुमित थोरात, सुभाष गांगुर्डे, सचिन सोनवणे, हेमचंद्र समदाडिया, योगेश तक्ते, विजय गोसावी, सचिन मोरे, रवी पवार, भूषण शिनकर, गणेश गायकवाड यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून नियोजन केले. स्वामी मुक्तानंद विद्यालयाबाहेर लसीकरणासाठी गर्दी झाली खरी; पण ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशा नागरिकांची ओळख पटवून त्यांना लसीकरण केंद्रात प्रवेश दिला जात असल्याने प्रत्यक्ष केंद्रात लसीकरणाचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे दिसले. मात्र, ऑनलाइन नोंदणी केलेल्यांची यादी आदल्या दिवशीच उपलब्ध करून दिल्यास अजून गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



नागरिक पहाटेपासूनच येत असल्याने गर्दी होऊन गोंधळ होतो. मात्र, कोव्हिशील्ड व कोवॅक्सिनच्या चौदाशे लसी प्राप्त झाल्या असून, दोन्ही गटांसाठी सोमवार ते शनिवार या कालावधीत प्रत्येकी शंभर लसी रोज दिल्या जाणार आहेत. १८ ते ४५ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्यांनाच प्रसिद्ध होणाऱ्या यादीप्रमाणे लस दिली जाईल.
- शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT