In front of the first step of the temple, there is a crowd of devotees for the Navaspurti and darshan on Friday.
In front of the first step of the temple, there is a crowd of devotees for the Navaspurti and darshan on Friday. esakal
नाशिक

Saptashrungi Devi : सप्तशृंग गडावर भाविकांची रीघ; 30 हजारावर भाविकांनी घेतले दर्शन

सकाळ वृत्तसेवा

Saptashrungi Devi : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी गडावर उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविक व पर्यटकांच्या वाढत्या गर्दीबरोबर गडावर नवसपूर्तीसाठी मोठ्या संख्येने भाविक गडावर हजेरी लावत असल्याने गडावर यात्रेचे स्वरूप आले आहे.

आज दिवसभरात गडावर तीस हजारावर भाविकांनी दर्शन घेतले. (crowd of devotees at Saptashrungi Fort Over 30 thousand devotees took darshan nashik news)

आदिमायेच्या दरबारात दरवर्षी चैत्र व वैशाख महिन्यात भाविक नवसपूर्तीसाठी मोठ्या संख्येने हजेरीलावतात. त्यामुळे गडावर यात्रोत्सवाशिवायही भाविक व पर्यटकांचा वर्षभर राबता कायम असतो.

त्यात दर मंगळवार, शुक्रवार, रविवार या दिवशी नवसपूर्ती करणाऱ्या भाविकांची विशेष गर्दी होत आहे. शुक्रवार हा देवीचा वार समजला जात असल्याने शुक्रवारी (ता २६) गडावर नवसपूर्तीसाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.

त्यामुळे गडावरील धोड्याकोंड्याच्या विहिरीपासून शिवालय तलावापर्यंतच्या परिसरात ठिकठिकाणी मंडप टाकलेले दिसले. झाडांच्या सावलीचा आसरा घेत गोड व तिखट स्वयंपाक व नवसपूर्तीचा धार्मिक विधी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

सांयकाळी उशिरापर्यंत ही स्थिती कायम होती. गडावर जागे अभावी व स्वयंपाक व पिण्याची गैरसोय टाळण्यासाठी नांदुरी परिसरातील पहिली पायरी, कळवण, वणी, अभोणा रस्त्यावरील पाण्याची व सावलीची सोय बघून ठिकठिकाणीही नवसपूर्तीच्या जेवणावळी होत होत्या.

नवसपूर्तीसाठी काही भाविक येतानाच पाण्याचे जार, तसेच ड्रम भरून आणत आहे. तर काही गडावर खासगी टँकरद्वारे तीनशे ते पाचशे रुपये देवून पाणी भरून घेत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खानदेशातून मोठी गर्दी

लग्नसराईचा धूमधडाका सर्वत्र सुरु असल्याने नववधू-वरांसह पाहुणे मंडळींची गडावर लग्न झाल्यानंतर कुलदेवीचे दर्शन घेण्यासाठी गडावर येत आहेत.

यात खानदेश भागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, तसेच नाशिक, पुणे, मुंबई, मध्य प्रदेश, गुजरात या भागातूनही नव दांपत्य दर्शनासाठी येत असल्याने वणी व कळवणकडून येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसून येत आहे.

नवदांपत्यांकडून सप्तशृंगी देवीला खण नारळाची, तसेच अकरावर साडी, ओटी भरण्याची पद्धत आहे. वधूच्या हातातील चुडा (बांगड्या) उतरून ते पहिल्या पायरी जवळील त्रिशुळाला अर्पण करण्याची प्रथा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

SCROLL FOR NEXT