Windows placed on the temple steps for darshan of devotees. esakal
नाशिक

Nashik: सलग सुट्यांमुळे सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी! फनिक्यूलर रोप-वे ट्रॉली तांत्रिक बिघडामुळे सुमारे 7 तास बंद

यामुळे वयोवृद्ध, महिलांची गैरसोय झाली. सायंकाळी रोप वे सेवा पूर्ववत सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

वणी : सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर सोमवारी (ता. २५) भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

त्यात फनिक्यूलर रोप-वे ट्रॉली तांत्रिक बिघडामुळे सुमारे सात तास बंद होती. यामुळे वयोवृद्ध, महिलांची गैरसोय झाली. सायंकाळी रोप वे सेवा पूर्ववत सुरू झाली. (Crowd of devotees at Saptshringi Fort due to consecutive holidays Funicular rope way trolley closed for about 7 hours Nashik)

सरत्या वर्षाचा शेवटचा आठवडा व त्यात शनिवार, रविवार व सोमवारी असलेली नाताळची सुट्टीमुळे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने सुमारे दीड लाखांवर भाविकांनी गडावर हजेरी लावली. त्यामुळे गडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान सुयोग गुरुबक्षानी फनिक्यूलर रोप-वे ट्रॉलीच्या मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्याने रोप-वे बंद केला होता.

अचानक उद्भवलेल्या बिघाडामुळे ‘रोप-वे’ने सुसह्य व जलदगतीने मंदिरात पोचण्याच्या नियोजनाने गडावर पोचलेल्या भाविकांचा हिरमोड झाला.

त्यात सुमारे साडेपाचशे पायऱ्या चढू न शकणाऱ्या भाविकांनी मंदिर पायऱ्यांवरून दर्शन घेतले. रोप-वे मार्ग बंद असल्यामुळे भाविकांची पायऱ्या मार्गावर एकच गर्दी झाली होती. बारी क्रमांक दहापर्यंत भाविकांच्या बाऱ्या लागल्या होत्या.

त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिरात पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागत होते. दरम्यान, ‘रोप-वे’च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून दुपारी चारनंतर रोप वे सेवा सुरू करण्यात आली.

यादरम्यान रोप वे क्षेत्रात असलेल्या प्रसाद, पूजा साहित्य व हॉटेल व्यावसायिकांना काहीसा आर्थिक फटका बसला, तर पहिली पायरी मार्ग व परिसरातील व्यावसायिक गर्दीमुळे समाधानी होते.

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुढील २ जानेवारीपर्यंत भाविकांची गर्दी गडावर कमी जास्त प्रमाणात कायम असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT