ST Strike Updates esakal
नाशिक

बसस्थानकांवर तुडुंब गर्दी! अजुनपर्यंत बससेवा पूर्वपदावर नाही

अरुण मलाणी

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्‍या संपामुळे (MSRTC Strike) अद्यापपर्यंत बससेवा पूर्वपदावर येऊ शकलेली नाही. दैनंदिन बसगाड्या व फेऱ्यांच्‍या संख्येत वाढ होत असली, तरी काही वेळा प्रवाशांच्‍या संख्येच्‍या तुलनेत बसगाड्या कमी पडत आहेत. रविवारी (ता. २०) नवीन सीबीएस बसस्‍थानकावर अशीच प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. काही प्रवासी तिकीट मिळविण्यासाठी रांगेत उभे होते, तर काहींची बसमध्ये जागा मिळविण्यासाठी धडपड सुरू होती. (ST Strike Updates)

गाडीत जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड

सध्या नाशिक विभागातून रोज सुमारे दोनशे बसगाड्या सुटत आहेत. पुणे, औरंगाबाद, धुळे या मार्गांवर खासगी शिवशाही, तर अन्‍य मार्गांवर लालपरीतून प्रवासी वाहतूक केली जात आहे. शनिवारी (ता. १९) व रविवारी प्रवाशांच्‍या वाढलेल्‍या संख्येच्‍या तुलनेत उपलब्‍ध बसगाड्यांची संख्या कमी पडत आहे. रविवारी अशीच स्‍थिती नवीन सीबीएस बसस्‍थानकावर निर्माण झाली होती. पुण्याला जाण्यासाठी विनावाहक शिवशाही बसगाडीचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची मोठी रांग लागली होती, तर वाहक असलेल्‍या बसगाड्या फलाटावर उभ्या केल्‍यावर लगेचच गाडीत जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड बघायला मिळाली. खिडकीतून आसनावर बॅग, रुमाल ठेवत जागा मिळविण्याचा प्रयत्‍न प्रवाशांकडून सुरू होता. सायंकाळी उशिरापर्यंत बसस्‍थानकावर गर्दी कायम होती.

जिल्‍हांतर्गत मार्गांवर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

सलग सुट्या, लग्‍नसराईमुळे जिल्‍हांतर्गत बसगाड्यांनाही प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. सटाणा, कळवण, मालेगाव, देवळा, निफाड, त्र्यंबकेश्‍वर आदींसाठी नाशिकहून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup साठी भारतीय संघाची घोषणा! CSK च्या खेळाडूकडे कर्णधारपद, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Swanandi Mangalsutra Trend: जान्हवीनंतर आता स्वानंदीचं मंगळसूत्र ट्रेण्डवर, तेजश्रीच्या हटके स्टाईलला पसंती

Viral Video: प्रवाशांच्या बॅगा थेट समुद्रात! व्हिडिओ पाहून लोक हैराण; नेमकं घडलं तरी काय?

'१० रुपयाचा बिस्कीट पुडा कितीला आहे?' विचारणाऱ्या शादाब जकातीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या...अश्लीलता पसरवल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

कॅश कुणाची? कोकणाचा बदला मराठवाड्यात? भाजपनं आता थेट इगोवर घेतलं! BJP-Shivsena फुटीच्या उंबरठ्यावर?

SCROLL FOR NEXT