A stormy crowd in the courtyard of Raje Chhatrapati Mitra Mandal.
A stormy crowd in the courtyard of Raje Chhatrapati Mitra Mandal. esakal
नाशिक

Nashik : सिडकोत देखावे बघण्यासाठी तुडुंब गर्दी

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : येथे विविध मंडळांनी साकारलेल्या पौराणिक आणि धार्मिक देखावे बघण्यासाठी होत असून, विविध स्पर्धांचा आबालवृद्धांसह सर्वच आनंद घेत आहेत. जुने सिडकोतील शिवाजी महाराज चौकातील राजे छत्रपती व्यायामशाळा मैदानात राजे छत्रपती मित्रमंडळाचे संस्थापक तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक बंटी तिदमे यांनी गणेशोत्सवानिमित्त दररोज विविध स्पर्धा आणि खेळांचे आयोजन केले आहे.

येथे विक्रमी गर्दी होत आहे. सुदृढ बालक स्पर्धा, रांगोळी, फॅशन शो, नृत्यकला, फनफेयर आणि पाककला, टॅलेंट शो सारख्या स्पर्धा दररोज घेण्यात येत आहेत. (Crowd to see ganeshotsav 2022 decoration spectacles in cidco Nashik Latest Marathi News)

महिलांसाठी विविध खेळ घेण्यात येत असल्याने महिलांची मोठी उपस्थिती असते. शिवसेना उपनेते बबन घोलप, माजी खासदार समीर भूजबळ, आमदार सीमा हिरे, उपनेते सुनील बागूल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार निर्मला गावित, जयंत दिंडे, महेश हिरे आदींनी येथील गणेशोत्सवाचे कौतुक केले आहे.

वीर सावरकर चौकातील राहुल गणोरे यांच्या वंदे मातरम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे विठ्ठल दिंडी सोहळ्याचा चलचित्र देखावा सादर केला आहे. या ठिकाणी देखील रोज विविध स्पर्धां होत आहे. तुळजाभवानी चौकात श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विजय रणाते आणि सचिन गावले संयोजन करत आहेत.

शुभम पार्क येथे शिवसेनाप्रणित शिवराज युवक मित्रमंडळातर्फे भगवान विष्णूचा नरसिंह अवतार हा पौराणिक देखावा सादर केला आहे. मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांचे हे मंडळ आहे. तर पवननगर भाजी मार्केट येथे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी राजे संभाजी सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून म्युझिक लायटिंगचा देखावा साकारला आहे.

शिवाजी चौकातील श्रीमंत सिडकोचा महाराजा नावीन्य रूपात प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष अक्षय खांडरे आणि सहकाऱ्यांनी प्रतिष्ठापनेच्या दिवशी जंगी मिरवणूक काढली होती. गणरायाची सुमारे वीस फूट भव्य मूर्ती आकर्षण ठरले आहे. श्री साई समर्थ युवा मंडळ आणि साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वाद्य संचातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यासोबतच सिंहस्थ नगर येथील नवदुर्गा मित्रमंडळ, एकांश फाउंडेशनचा नाशिकचा श्री, सिडको वसाहत मित्रमंडळ, खोडे मळा येथील वृंदावन कॉलनी मित्रमंडळ, मोरया फ्रेंड्स सर्कल या मंडळांच्या आकर्षक गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT