Crowds of tourists on the Gangapur and kashyapi dam
Crowds of tourists on the Gangapur and kashyapi dam  
नाशिक

धरणावर बिनधास्त पर्यटकांची गर्दी; सेल्फीसाठी अतिउत्साही घालतायत जीव धोक्यात

राम खुर्दळ

नाशिक/गिरणारे : लॉकडाउनमुळे पर्यटनावर अनेक प्रतिबंध असले तरी, धरणाच्या धोकादायक ठिकाणी मात्र खुलेआम पर्यटन सुरु आहे. गंगापूर, कश्यपी धरणांचे किनारे सातत्याने पर्यटकांच्या गर्दीत हरवलेले असतात. अति उत्साही पर्यटकांकडून अनेकदा घोकेदायक ठिकाणी सेल्फीसाठी जीव धोक्यात टाकतात.

धरणावर फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत अनेकदा दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. सध्या कोरोनाच्या काळातही अतिउत्साही पर्यटकांची धरणांच्या काठावर गर्दीच वाढली आहे. धरणांच्या काठावर लावलेले सुरक्षित पर्यटनाचे फलकांची टवाळखोरांनी मोडतोड केली आहे. बेशिस्त पर्यटकांना रोखण्यासाठी ग्रामीण पर्यटन पोलीस यंत्रणाही कुठं दिसत नसल्याने पर्यटकांकडून शिस्त मोडण्याचे प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

गंगापूर व कश्यपी धरणांच्या काठावर जाणे व असुरक्षित ठिकाणी बिनधास्त मौजमजा करणाऱ्या शहरातील कित्येकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे,सेल्फी काढतांना भान विसरून पाय घसरून अचानक खोल पाण्यात बुडल्याने कित्येकांचे जीव गेले आहेत. धरण क्षेत्रात दारूच्या कचरा बाटल्या प्लास्टिक कचऱ्याला अटकाव करणारी कुठलीही यंत्रणा नाही. - ॲड प्रभाकर वायचळे (सामाजिक कार्यकर्ता)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT