Farmer Vilas Datare of Kautikpade has a blooming sunflower farm in his field adjacent to Bhakshi- Vanoli Road. esakal
नाशिक

Sunflower Crop: कौतिकपाडेतील सुर्यफूलांची शेती वेधतेय लक्ष! विलास दातरेंकडून 12 एकर सूर्यफुलांची लागवड

सकाळ वृत्तसेवा

Sunflower Crop : कसमादेतील बळिराजा प्रयोगशीलतेत नेहमीच आघाडीवर राहतो. निसर्गाशी दोन हात करत वेळोवेळी पीक पद्धतीत बदल करण्याचे तंत्र या भागातील शेतकऱ्यांनी अंगीकारले आहेत.

कौतिकपाडे (ता.बागलाण) येथील शेतकरी विलास राघो दातरे यांनी पारंपरिक शेती व्यवसायात बदल करून सूर्यफूल या तेलबियाची शेती फुलविली आहे. कसमादे परिसरात त्यांनी नवा प्रयोग करत उत्तम शेतीचा अवलंब केला आहे.

भाक्षी-वनोली रस्त्यानजीक आपल्या बारा एकर क्षेत्रात त्यांनी सूर्यफुलाची लागवड केली आहे. आकर्षक सूर्यफूले या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सुर्यफुलामुळे श्री. दातरे यांच्या शेतात जणू पिवळा गालिचाच पसरला आहे. (cultivation of sunflowers in Kautikpade attracting attention 12 acres of sunflower plantation by Vilas Datare nashik news)

श्री. दातरे यांनी पारंपरिक शेतीला पर्यायी शोधला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन वर्षापासून पारंपारिक शेतीत उत्पन्न मिळाले नाही. अनेक अडचणींचा सामना करत शेती व्यवसाय टिकवून ठेवला.

खरीप हंगामात त्यांनी सूर्यफूल लागवड केली. पीक बहरात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे सूर्यफूल वाळविण्यासाठी अडचणी येत आहेत. एकरी साधारणतः ७ ते ८ क्विंटल उत्पादन येते.

सध्या सूर्यफुलाचा भाव साडेसहा ते सात हजार रुपये क्विंटल दरम्यान आहे. सूर्यफूलाची शेती बहरल्याने या भागातून जाणारे तरुण व नागरिक मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी आवर्जून थांबत आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गुणकारी सूर्यफूल

सूर्यफूल हे भारतातील सर्वात महत्त्वाचे तेलबिया पिकांपैकी एक आहे. हा जगातील तेलाचा प्रमुख स्रोत आहे. सूर्यफूल तेल हे इतर वनस्पती तेलांपेक्षा प्रिमियम तेल मानले जाते आणि बाजारात त्याला मोठी मागणी आहे.

हे पीक ९० ते १०० दिवसांत परिपक्व होते. सूर्यप्रकाशात ते वाळविले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. सूर्यफुलाचे फळ खाल्ल्याने डोक्यावरील केस गळण्याची समस्या दूर होते असे मानले जाते. तसेच कान दुखण्यापासून आराम मिळतो असे जाणकर सांगतात.

"यावर्षी उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होती. कांद्याला पुरेसा भाव नाही. त्यामुळे पारंपरिक पिकाला फाटा देत सूर्यफूल शेती केली. परंतु अवकाळी पावसाचा फटका बसत असून सूर्यफूल वाळविण्यासाठी अडचणी येत आहे." - विलास दातरे, उत्पादक, कौतिकपाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT