Nylon Manja esakal
नाशिक

Nashik: येवल्यात नायलॉन मांजाने दुचाकीस्वार जखमी; पोलीस अन नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास विक्री

नायलॉन मांजा विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असुन प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : भोगीच्या दिवशी येथील पतंगोत्सवाला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी एका तरुणाचा ओठ चिरून सुमारे १२ टाके पडले. यामुळे नायलॉन मांजा विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

धोकेदायक असलेल्या वापर व विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा विक्रीला आला आहे. कळवण येथून येवल्यात पैठणी घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने शनिवारी (ता. १३) गळा चिरला गेला. त्याला तब्बल आठ टाके पडले आहेत. (Cyclist injured by nylon manja illegal selling due to negligence of police and yeola municipal administration Nashik)

नायलॉन मांजा विक्री व वापर होत असल्याने रोजच घटना घडत असून, प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

भोगीच्या दिवशी रविवारी (ता. १४) संक्रांतीसाठी अनिल आपरे नाशिकहून दुचाकीवरून घराकडे येत असताना, हेल्मेट असूनही दोरा आत अडकून ओठ चिरल्याची दुर्दैवी घटना संभाजीनगर रोडवरील सिद्धिविनायक हॉस्पिटलजवळ घडली.

ओठ चिरल्याने रक्तस्राव बराच काळ थांबला नव्हता. दुचाकीचा काही भाग रक्तमय झाला होता. या जखमेवर सुमारे १० टाके पडले. डोक्यातील हेल्मेटची काच नायलॉन मांजाने कापली गेली.

जखमीवर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. दरम्यान, नगरपालिका व प्रशासकीय यंत्रणा नायलॉन मांज्याबाबत गांभीर्याने का घेत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT