Speaking at the press conference, Guardian Minister Dada Bhuse, Sports Minister Sanjay Bansode. esakal
नाशिक

Dada Bhuse : ...तर सर्वोच्च न्यायालयावर शंका उपस्थित करणार का? दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी कायदे, नियम आणि वस्तुस्थितीवर आधारित आमदार अपात्रतेबाबत निर्णय दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी कायदे, नियम आणि वस्तुस्थितीवर आधारित आमदार अपात्रतेबाबत निर्णय दिला आहे.

त्याला विरोधकांनी आव्हान दिले आणि आमच्याच बाजूने निकाल लागला तर सर्वोच्च न्यायालयावर शंका उपस्थित करणार का, असा प्रश्न उपस्थित करीत सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर टीका केली आहे. (Dada Bhuse advice to Uddhav Thackeray Decisions regarding MLA disqualification based on rules and facts nashik news)

नाशिकमध्ये पाच दिवसांपासून सुरू असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम मंगळवारी (ता. १६) पार पडला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री दादा भुसे म्हणाले, की न्यायाला दोन बाजू असू शकतात. ज्याला मान्य नाही, त्याला दाद मागण्याचा अधिकार आहे; परंतु जनतेत संभ्रम निर्माण करणे आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही.

या अगोदरही उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, हे उचित नसल्याचेही भुसे म्हणाले. ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नसल्याची टीका केली. यावर दादा भुसे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष आहे. पीएम किसान योजना, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशा अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे भुसे यांनी सांगितले.

‘दावोस’चा वाद बालिशपणा

मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेल्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. यावर दादा भुसे यांना विचारले असता, ते म्हणाले, की विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे. महाराष्ट्रात विकासकामांचे जे प्रकल्प आहेत, ते पाहून जागतिक पातळीवरील गुंतवणूक होईल. दावोसवरून हजारो कोटींचे करार झाले, याची माहिती मुख्यमंत्री देतील. आपल्या राज्याचे नाव कमी होईल, यासाठी हे लोक बालिशबणा करीत असल्याची टीका त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता केली.

त्यांच्या बुद्धीची कीव वाटते

जितेंद्र आव्हाड यांनी राम कोणत्या जातीचे होते, ते बहुजन होते की नाही, तसेच मटण म्हणजे काय, यावर पुन्हा एकदा भाष्य केले. यावर दादा भुसे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, की मतांच्या लाचारीसाठी माणूस किती खालच्या पातळीवर जातो. यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT