Dada Bhuse on Aditya Thackeray
Dada Bhuse on Aditya Thackeray esakal
नाशिक

Dada Bhuse on Aditya Thackeray | केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही : भुसे यांचा आदित्य ठाकरेंना टोला!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांचा समाचार घेतला. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, तर लोकांमध्ये सतत वावरावे लागते.

आम्ही काही क्षणांसाठीच थोडे घराबाहेर पडतो, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. (Dada Bhuse criticised Aditya Thackeray nashik political news)

आदित्य ठाकरे शिंदे सरकारवर सडकून टीका करत असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आज आव्हान दिले. या पार्श्वभूमीवर वसंत व्याख्यानमालेच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री भुसे म्हणाले, की आम्ही सातत्याने जनतेसोबत राहतो.

सहा महिन्यांपासून त्यांना तीन शब्दांच्या पलीकडे बोलता येत नाही. सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. त्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्देच राहिलेले नाहीत. त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलले पाहिजे.

आदित्य ठाकरे यांनी आजोबा चोरल्याचे म्हटले आहे, त्यावर भुसे म्हणाले, की हिंदुहदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्र्पुरुष आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मनाचा कोतेपणा येथे दिसून येतो.

उद्या हे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनाही चोरले, असे म्हणतील, हा त्यांच्या मनाचा कमीपणा आहे. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, लोकांमध्ये सातत्याने असले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

पालकमंत्री भुसे म्हणाले...

- सहा महिन्यांपासून तीन शब्दांपलीकडे ते बोलत नाहीत

- त्यांची कीव येते, आता ग्रामपंचायत सदस्यांनी ते आव्हान देत आहेत

- लोकशाही प्रक्रियेत कोणी कुठेही फिरू शकतो

- काही क्षणांसाठी थोडीच बाहेर पडतो

- आजोबा चोरले हे म्हणणे हा मनाचा कोतेपणा

- आज ५० जणांनी प्रवेश केला; आणखी धक्के बसतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT