Dada Bhuse news esakal
नाशिक

Dada Bhuse : ऑगस्टपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन करा : दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse : हवामान विभागाच्या कमी पावसाच्या अंदाजानुसार नागरिकांना ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होण्याचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्या. (Dada Bhuse statement on Plan to supply water till August nashik news)

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ८) पाणी टंचाई आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, नाशिक महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता चव्हाण के., मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, जून व जुलै महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी ऑगस्ट अखेरपर्यंत पुरविण्याबाबत शासनस्तरावरून आदेश असल्याने त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.

नागरिकांना विश्वासात घेऊन गरजेनुसार आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याबाबतचा निर्णय आगामी काळात घेण्यात येईल, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ज्या भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावी. जेणेकरून संभाव्य पाणी टंचाई काळात त्या पाणी पुरवठा योजनांचा नागरिकांना उपयोग होईल.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच, गावपातळीवरील नादुरुस्त विंधन विहिरींच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. पाण्याचा वापर जपून करावा, तसेच, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे सांगितले.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, गावपातळीवरील पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करून टँकर्सची संख्या निश्चित करण्यात यावी. दुष्काळी गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात यावी.

पाणी आरक्षणाबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीनंतर जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाच्या प्रचार रथाला पालकमंत्री भुसे यांनी हिरवी झेंडी दाखविली. आमदार डॉ. राहुल आहेर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT