Screen Time of mobile phones
Screen Time of mobile phones esakal
नाशिक

‘Screen Time’ वाढल्याने ‘Brainfog’चा धोका!; आरोग्‍यावर होतायत गंभीर परिणाम

अरुण मलाणी

नाशिक : स्‍मार्टफोनचा वाढलेला वापर... कामानिमित्त संगणक, लॅपटॉपसमोर तासन तास घालवला जाणारा वेळ... ओटीटी, सिनेमागृहात मनोरंजनासाठी दिलेला वेळ... अशा विविध कारणांनी तरुणाईचा ‘स्‍क्रीन टाइम’ वाढलेला आहे. त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले असून, मेंदूशी निगडित ‘ब्रेन फॉग’ हा आजार होण्याचा धोका वाढला आहे. मेंदू थकल्‍याने आरोग्‍यविषयक समस्‍या वाढत असल्‍याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. (Danger of Brain Fog due to increase in Screen Time Serious health effects Nashik Latest Marathi News)

कोरोना महामारीच्‍या काळापासून संपूर्ण जग ऑनलाइन व्‍यासपीठावर आले आहे. कार्यालयीन बैठकींपासून, तर शिकवणीचे वर्ग ऑनलाइन भरवले होते. साधारणतः गेल्‍या दोन वर्षांमध्ये त्यामुळे ‘स्‍क्रीन टाइम’ प्रचंड वाढलेला आहे. परिणामी, साधारणतः २० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये ‘ब्रेन फॉग’ ही समस्या उद्‍भवते आहे. वेळीच सावधगिरी बाळगली नाही, तर मेंदूशी निगडित गंभीर आजार उद्‍भ‍वण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

‘ब्रेन फॉग’ची गंभीर लक्षणे

‘ब्रेन फॉग’ची विविध लक्षणे आढळतात. त्यामध्ये विस्मरण होणे, चिडचिड वाढणे, विचार करण्याची शक्ती कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, आत्मविश्वास कमी होणे, मानसिक स्थैर्य नसणे, सतत तणावात असणे, अस्थिर झोप व निद्रानाश, चक्कर येणे, कामातील एकाग्रता कमी होणे, याचा समावेश होतो. ‘ब्रेग फॉग’ होण्याच्या कारणांमध्ये उशिरापर्यंत जागरण, तणाव, मेंदूचा थकवा, हार्मोन्समधील बदल, व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता, ॲनिमिया, मेनोपॉझ, कर्करोग आणि मधुमेहावरील औषध याचा समावेश आहे.

घ्यावयाची काळजी

- स्क्रीनचा मर्यादित वापर असावा.
- रात्रीच्या वेळी, झोपण्याच्या किमान दोन तास आधी वापर टाळावा.
- जागरण टाळावे व किमान सात ते नऊ तास झोप घ्यावी.
- ध्यान, नियमित किमान ४५ मिनिटे व्यायाम करावा.
- सायकलिंग करावे आणि व्हिटॅमिनयुक्त (बी-१, बी-३, बी-५, बी-१२) पदार्थांचे सेवन करावे.

संस्कृतमधील लघुसूत्र

अति सर्वत्र वर्जयेत्

हे संस्कृतमधील लघुसूत्र प्रसिद्ध आहे. अर्थात, अति करण्यापासून नेहमी वाचायला हवे. अति करण्यातून सदैव हानिकारक परिणाम होतो, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवण्याची आवश्‍यकता आहे.

"‘ब्रेन फॉग’ म्हणजेच मेंदूचा थकवा. एकसारखे स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांच्या थकव्यासोबत मेंदूला थकवा येतो. वेळीच काळजी व उपचार न घेतल्‍यास मेंदूशी निगडित गंभीर आजार होऊ शकतात. विशेषतः तरुणांनी खबरदारी घ्यावी व लक्षणे जाणवल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा."
-डॉ. श्रीपाल शाह, मेंदूविकारतज्‍ज्ञ, सह्याद्री हॉस्पिटल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT