Eknath Shinde Shrikant Shinde Sakal
नाशिक

Nashik News: विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार! कहांडोळ पाडा येथे पुलाचे काम सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिल्याने विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे व्हिडिओ कॉलद्वारे आभार मानले.

सकाळ वृत्तसेवा

पेठ : जीव धोक्यात घालून शाळेसाठी पातेल्यातून प्रवास करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कहांडोळ पाडा (ता. पेठ) येथील विद्यार्थ्यांचा ये-जा करण्याचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिल्याने विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे व्हिडिओ कॉलद्वारे आभार मानले. (dangerous journey of students will stop Bridge work underway at Kahandol Pada Nashik News)

मागील वर्षी पावसाळ्यात आदिवासी पेठ तालुक्यातील कहांडोळ या आदिवासी पाड्यातील विद्यार्थी शाळेत जाताना जीव धोक्यात घालून पातेल्यातून जात असल्याच्या दृश्यांनी महाराष्ट्र हळहळला होता.

या दृश्यांची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली. या पिता पुत्रांनी संबंधित विद्यार्थ्यांचा शाळेत ये-जा करण्याचा प्रश्न सुटावा, तसेच गावकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्नही सुटावा, यासाठी या भागात तत्काळ साकव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

त्या ठिकाणी या कामाची सुरवात झाली आहे. विक्रमी वेळेत कामाला सुरवात झाल्याबद्दल कहाडोळपाडा ग्रामस्थांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे व्हिडिओ कॉलद्वारे आभार मानले.

दरम्यान, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा घेण्याच्या आदेश आम्हाला दिले आहेत.

त्यानुसार हा पूल पूर्ण होईपर्यंत या कामाचा पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी सांगितले.

कहांडोळ पाडा येथील पुलाचे काम सुरू झाले असून, या कामाचा पाठपुरावा थेट मुख्यमंत्री कार्यालयातून होत असल्याने आम्ही विक्रमी वेळेत हा पूल बांधणार असल्याचा विश्वास पेठचे कनिष्ठ अभियंता गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

संवेदनशील शासन आणि गतिमान प्रशासन असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सुटू शकतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कहांडोळ पाडा येथील सुरू झालेले पुलाचे काम होय.

अशाच संवेदनशील पद्धतीने कामे झाल्यास महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटण्यास वेळ लागणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT