school dangerous building.  esakal
नाशिक

Dangerous School Building: जिल्ह्यात 441 शाळा धोकादायक इमारतीत! सर्वाधिक 85 शाळा सुरगाण्यातील

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Dangerous School Building : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे देत असताना प्रशासनाने शाळांच्या इमारती, वर्गखोल्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

जिल्हा परिषदेच्या तीन हजार २६१ शाळांपैकी सुमारे ४४१ शाळा सध्या धोकादायक इमारतीत भरत आहेत. यात सर्वाधिक ८५ शाळा सुरगाण्यातील आहेत.

या शाळांमध्ये मुले कशी पाठवावीत, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे. या शाळांचे निर्लेखन करून नव्याने बांधकाम करण्याची मागणी होत आहे. (Dangerous School Building 441 schools in district in dangerous building Maximum 85 schools in Surgana nashik)

राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला आहे. वाचन आनंद दिवस, ज्ञानरचनावाद डिजिटल शाळा, अक्षर सुधार कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वळविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शहरातील खासगी शाळांच्या विद्यार्थ्यापेक्षाही स्मार्ट व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. भौतिक सुविधांसाठी ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा उपक्रम सुरूच ठेवला आहे; परंतु अपुऱ्या निधीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा, वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत.

भिंती पडलेल्या, छत उडालेले

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या एकूण तीन हजार २६१ शाळा असून, यात सुमारे दोन लाख ७८ हजार ७९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र यातील ४४१ शाळांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी शाळांच्या भिंती पडल्या आहेत, तर काही शाळांची छत उडालेली आहेत.

अनेक शाळांच्या संरक्षण भिंती जमीनदोस्त झाल्या असून, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा देखील नाही. शाळांची अशी गंभीर परिस्थिती यूडायसवर भरलेल्या माहितीतून पुढे आली आहे.

नादुरुस्त शाळा दुरुस्तीसंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत व पालकांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो. शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडून अपेक्षित प्रमाणात निधी प्राप्त होणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात वाढणार धोका

नादुरुस्त शाळांचा सर्वाधिक धोका पावसाळ्यात असतो. अनेक शाळा जुन्या व दगडी बांधकामाच्या असल्याने त्यात पाणी मुरून त्या पडू शकतात. वादळाने अनेक शाळांची पत्रे उडतात. त्यामुळे अशा शाळांतील विद्यार्थी पावसाळ्यात जीव मुठीत धरून असतात.

गळक्या, पडक्या शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. मुलांचे शैक्षणिक नुकसान करायचे का शाळेला पाठवून त्यांच्या जिवाशी खेळ करायचा, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुरुस्तीसाठी निधी कधी?

४४१ शाळा नादुरुस्त असून, या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. साधारण वर्गखोल्या बांधकामासाठी १३ ते १४ लाख रुपयांचा निधी लागतो. दुरुस्तीसाठी पाच ते दहा लाखदरम्यान निधीची गरज आहे.

शासनाकडून दर वर्षी शाळा दुरुस्त्यांसाठी निधी प्राप्त होत असतो. मात्र नादुरुस्त शाळांची संख्या मोठी असल्याने निधी अपुरा पडतो.

तालुकानिहाय धोकादायक इमारती

तालुका - शाळांची संख्या

बागलाण ३३

चांदवड २१

देवळा ०६

दिंडोरी २२

इगतपुरी ३५

कळवण ३७

मालेगाव २६

नांदगाव २८

नाशिक १३

निफाड ३३

पेठ १९

सिन्नर २६

सुरगाणा ८५

त्र्यंबकेश्वर ३०

येवला २७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT