DAREGAV WATER ISSUE 1.jpg
DAREGAV WATER ISSUE 1.jpg 
नाशिक

विदारक चित्र.."वारंवार हात धुणं परवडत न्हाय आम्हाला...इथं हंडाभर पाण्यासाठी सुध्दा वनवास हाय"

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/दरेगाव : एका बाजूला कोरोना संक्रमणाच संकट उभे आहे. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील काही भागात भीषण पाणी टंचाईच संकट आ वासून उभं ठाकलंय. चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून पाण्यावाचून दिवस कसे काढायचे असा प्रश्न लोकांना पडला आहे

भरउन्हात पाण्यासाठी वणवण

चांदवड तालुक्‍यातील पूर्व भागातील गावांमध्ये एकही धरण नसल्याने दर वर्षी पाणीटंचाई भासते. त्यासाठी येथे ग्रामपंचायतीतर्फे गावातील विहिरीमध्ये टॅंकरद्वारे पाणी टाकून विहिरीतून पाण्याची टाकी भरले जाते. त्यानंतर टाकीचे पाणी गावात सोडले जाते. मात्र टाकीचे पाणी कमी प्रमाणात येत असल्याने ग्रामस्थांना एक ते दोन किलोमीटरवरील विहिरींचा आधार घेत भरउन्हात डोक्‍यावर पाणी आणावे लागत आहे. 

भारनियमनामुळे टॅंकर असूनही तहान भागेना 
गावातील कूपनलिकांमध्ये जलपर्णी टाकली आहे. त्यावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. मात्र वीजपुरवठा झाल्यानंतर अवघे आठ ते दहा हंडेच पाणी भरले जाते. नंतर या कूपनलिकेचे पाणी पाच ते दहा मिनिटे थांबून एकेक हंडा पाणी भरले जाते. बराच वेळ थांबूनही पाणी येत नाही. 42 खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत नाग्या-साक्‍या धरणावरून 42 खेड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. परंतु या योजनेचे बिल थकीत असल्याने या योजनेचा पाणीपुरवठाही सध्या बंद आहे. त्यामुळे नाग्या-साक्‍या धरणात भरपूर पाणी असतानाही दरेगाववासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT