Indiranagar burnt cable.
Indiranagar burnt cable. esakal
नाशिक

Nashik News : केबल जळाल्याने इंदिरानगर परिसरात अंधार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विजेची केबल नादुरुस्त झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी इंदिरानगरच्या आजूबाजूचा बहुतांश परिसर पाच तासांपेक्षा जास्त वेळ अंधारात राहिला. उन्हामुळे उकाड्याने हैराण झालेल्या इंदिरानगरवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

उन्हाळ्यामुळे सायंकाळीच व्यवसायाची संधी मिळत असल्याने व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. (Darkness in Indiranagar area due to burnt cable Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास द्वारका येथील तिगरानिया उपकेंद्राजवळ उच्चदाबाच्या वाहिनीत बिघाड झाल्याने ही वाहिनी जळाली. त्यामुळे द्वारका तसेच टाकळी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या द्वारकापासून इंदिरानगर, डीजीपीनगर, अशोका मार्ग, विनयनगर, वडाळा आदी भागांतील बहुतांश ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला.

रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी दिली. शनिवारीही (ता. १९) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ असलेल्या परशुराम चौकात टँकरने झाडाला धडक दिल्याने उच्च दाबाची विजेची वाहिनी नादुरुस्त झाली होती.

त्यामुळे तब्बल पाच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सलग दोन दिवस हा प्रकार घडल्याने नागरिक कमालीचे हैराण आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT