Preparation of Ravan Dahan
Preparation of Ravan Dahan esakal
नाशिक

Dasara Festival 2022 : गांधी तलावाजवळ आज रावणदहन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटीतील रामकुंडाशेजारील चतु:संप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरातर्फे दसऱ्याचे औचित्य साधत रावण दहनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिककरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या या परंपरेचे हे ५५ वे वर्ष असून, यंदा साठ फुटी रावणाचे दहन करण्यात येणार आहे. दरम्यान, पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महंत कृष्णचरणदास महाराज यांनी दिली. (Dasara Festival 2022 Ravan Dahan today near Gandhi pond on godaghat Nashik Latest Marathi News)

महंत दिनबंधुदास महाराज या आखाड्याचे प्रमुख असताना त्यांनी १९६७ साली या रावणदहनाची प्रथा सुरू केली. त्यानंतर महंत कृष्णचरणदास यांनी ती कायम ठेवली. कोरोना प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षे ही प्रथा बंदच होती. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात हा सोहळा रंगणार आहे. सायंकाळी सातच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत रावणदहनाचा सोहळा रंगेल.

तत्पूर्वी राम, लक्ष्मण, सीता, रावण, बिभीषण व वानरसेना यांची पंचवटी परिसरातून पारंपारिक मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणूक गांधी तलावाशेजारील मैदानावर आल्यावर त्याठिकाणी श्रीरामाची वानरसेना व रावणाच्या सेनेत तुंबळ लढाई झाल्यावर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात येईल. त्यानंतर रावण दहनाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.

रामकुंड शेजारील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान श्री व्यंकटेश बालाजी, श्रीदेवी व भुदेवी यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. श्री बालाजी विवाहाचा हा सोहळा भाविकांच्या उत्साहात पार पडला. या वेळी श्री दासबोधाच्या सामुदायिक पारायणाचेही आयोजन करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT