Vehicle Shopping
Vehicle Shopping esakal
नाशिक

Dasara Festival Shopping : ई-वाहनाला पसंती, आज साधणार खरेदीचा मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दसऱ्याच्‍या मुहूर्तावर बाजारात चैतन्‍याचे वातावरण बघायला मिळत असून, ऑटोमोबाईल क्षेत्रातही सकारात्‍मक दृष्य निर्माण झाले आहे. वाढत्‍या इंधनदरांमुळे अनेक ग्राहकांकडून ई-वाहनाला पसंती दिली जाते आहे. दरम्‍यान, मंगळवारी (ता.४) ग्राहकांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याची लगबग सुरू होती. दसऱ्याचा मुहूर्त साधत वाहन घरी नेण्याचे नियोजन आखले आहे. (dasara festival shopping electric Vehicle trends today is time to buy vehicles Nashik Latest Marathi News)

मंगळवारी विविध ऑटोमोबाईल कंपन्‍यांच्‍या दालनांमध्ये ग्राहकांची वर्दळ होती. दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिकल वाहनांना ग्राहकांची पसंती मिळते आहे. दसर्याचा उत्‍साह लक्षात घेता कंपन्यांकडून विविध आकर्षक योजना उपलब्‍ध करून दिलेल्‍या आहेत. यामध्ये व्याजदरामध्ये सवलत, कॅशबॅक योजना, रोख खरेदीवर सवलत, अतिरिक्‍त सर्व्हिसिंगचा पर्याय अशा विविध योजनांचा ग्राहकांना लाभ होणार आहे.

दरम्‍यान बुधवारी (ता.५) वाहन घरी नेण्याबाबत अनेक ग्राहकांनी नियोजन आखलेले आहे. त्‍यासाठी कागदपत्रांची आगाऊ पूर्तता करण्यात आलेली आहे. ग्राहकांचा उत्‍साह पाहता कंपन्‍यांकडून दालनाची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. विद्युत रोषणाईने दालने उजळून निघालेली आहेत.

‘त्‍यांना’ करावी लागतेय वेटिंग..

राष्ट्रीय पातळीवर सेमिकंडस्‍टरचा तुटवडा लक्षात घेता ऑटोमोबाईल उत्‍पादन प्रभावित झालेले आहेत. मागणी असलेल्‍या काही वाहनांसाठी प्रतीक्षा यादी तयार केलेली आहे. तर, मागणीच्‍या तुलनेत ई-कारचे उत्‍पादन होत नसल्‍याने तेथेही प्रतीक्षा यादीद्वारे ग्राहकांना वाहन उपलब्‍ध केले जाते आहे. अशात दसऱ्यानिमित्त वाहन खरेदीच्‍या प्रयत्‍नात असलेल्‍या काही ग्राहकांना मात्र प्रतीक्षा करावी लागते आहे.

दुचाकी बाजारपेठेत उत्‍साह

दुचाकी वाहनांच्‍या बाजारपेठेलाही झळाळी आलेली बघायला मिळते आहे. मोपेड तसेच गिअरच्‍या वाहनांची बुकिंग करत ग्राहक दसऱ्याच्‍या मुहूर्तावर वाहन खरेदी करणार आहेत. ई- बाईकला पसंती मिळत असल्‍याने एकूण खरेदीच्या सुमारे २५ टक्‍के दुचाकी ई-बाईक असतील, असा अंदाज व्‍यावसायिकांनी वर्तविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT