Ravan Dahan esakal
नाशिक

Dasara Ravan Dahan 2022 : जय श्रीरामाच्या घोषात रावणदहन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘जय श्रीराम’, ‘पवनपुत्र हनुमानकी जय’च्या घोषात व नाशिककरांच्या अभूतपूर्व उत्साहात रामकुंडाजवळील गांधी तलावाशेजारी साठ फुटी रावणदहन करण्यात आले. चतु:संप्रदाय आखाड्याकडून करण्यात आलेल्या या दहनापूर्वी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. या वेळी राम- रावण सेनेत तुंबळ युद्धही रंगले.

गत ५५ वर्षांपासून चतु:संप्रदाय आखाड्यातर्फे दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचे आयोजन केले जाते. यंदा गांधीनगर येथील कलाकारांनी बनविलेल्या साठ फुटी रावणाचे दहन करण्यात आले. या वेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, चतु:संप्रदाय आखाड्याचे प्रमुख महंत कृष्णचरणदास, रामसिंग बावरी, पद्माकर पाटील, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे आदींसह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने आसमंत उजाळून गेला. (Dasara Ravan Dahan 2022 with chanting Jai Shri Rama at ganga ghat nashik Latest Marathi News)

राम-रावण सेनेत तुंबळ युद्ध

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रावणदहन करण्यापूर्वी श्रीराम व रावणाच्या राक्षस सेनेत तुंबळ युद्ध रंगले. तत्पूर्वी आखाड्यापासून या सेनेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा मार्गे ही मिरवणूक रामकुंडावर पोचली. त्यानंतर या दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध रंगले.

फ्लॅशचा लखलखाट

साधारण साडेसातच्या सुमारास पोलिस आयुक्तांचे आगमन झाल्यावर पावणेआठच्या सुमारास रावणाच्या प्रतिकात्मक साठ फुटी पुतळ्यास अग्नी देण्यात आला. या वेळी हजारो नाशिककरांनी गर्दी केली होती. रावणदहनाचा हा सोहळा मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी हजारो फ्लॅश लखलखले. यात तरुणाबरोबरच ज्येष्ठांचाही मोठा समावेश होता.

तोबा गर्दी

गंगाघाटावरील रावण दहन व सांडव्यावरील देवीच्या दर्शनासाठी तोबा गर्दी उसळली होती. त्यातच बुधवारच्या आठवडे बाजारामुळे रामकुंड, सरदार चौक, शनी चौक, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, दिल्ली दरवाजा, तिवंधा चौक या भागात वाहतुकीची मोठी कोंडी अनुभवण्यास मिळाली. सरदार चौक परिसरात तर अनेक वाहने अर्धा तास एकाच जागी थांबून होती, यावरून गर्दीची कल्पना यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Vasant Hankare: पोरांनाही रडवलं! वसंत हंकारेंनी स्वीकारलं चॅलेंज; म्हणाले, तू लाव कितीही ताकद...

Winter Low Water Intake Risks: हिवाळ्यात किती पाणी प्यायलं पाहिजे? प्रमाण कमी झाल्यास मेंदूसह शरीरावर होतात 'हे' परिणाम

SCROLL FOR NEXT