Crime esakal
नाशिक

Nashik Crime News: सासरच्या घराचा कब्जा घेण्यासाठी सुनेची महिला भाडेकरूला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सासरच्या मंडळींकडे असलेल्या व सध्या भाडे तत्त्वावर दिलेल्या घराचा कब्जा घेण्यासाठी गेलेल्या सुनेने दोघा पुरुषांच्या मदतीने भाडेकरू महिलेला मारहाण केल्याची घटना सातपूरच्या श्रमिकनगर भागात घडली आहे. (Daughter in law beats up female tenant to take possession of father in laws house Nashik Crime News)

याप्रकरणी भाडेकरूने दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिस ठाण्यात १ महिला व दोन पुरुषांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ऊर्मिला महालकर (७५ रा. राज्य कर्मचारी वसाहत) यांचे श्रमिकनगर आयटीआय कॉलनी येथील त्रिमूर्ती रो- हाऊसमध्ये स्वतःचे घर असून सध्या ते घर मोनिका प्रवीण वानखेडे (वय २५) या महिलेला भाडे तत्त्वावर दिले आहे.

ऊर्मिला महालकर यांची सून अर्चना विक्रम महालकर यांनी सासरच्या मालमत्तेवर ताबा सांगत १२ मार्चला भाडेकरू मोनिका वानखेडे यांना आत्ताच्या आत्ता घर खाली कर असे धमकावत शिवीगाळ व दमदाटी केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांच्यासोबतचे विजय महाजन व रोहन (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी मोनिका यांना मारहाण केली. जखमी मोनिका यांनी घरमालक ऊर्मिला महालकर यांच्यासह त्यांच्या मुली पूनम डहाळे व नीलम माळवे यांना घटनास्थळी बोलविले.

त्यांनी संशयिताना विचारणा केली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. पुनम डहाळे व नीलम माळवे, भाडेकरू मोनिक वानखेडे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, महिन्याभरापूर्वी यातील संशयितांनी फिर्यादीविरुद्ध मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT