Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik : सासऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सुनेची मुक्तता

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : सासऱ्याला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सुनेसह (Daughter in Law) तिचे आई- वडील अशा तिघा संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. येथील अपर जिल्हा सत्र न्यायाधीश वाय. डी. गौड यांनी हा निकाल दिला. (Daughter in law released from case of forced her father in law to commit suicide Nashik Crime News)

न्यायडोंगरी येथील अंबादास आहेर हे वीज मंडळातून निवृत्त झाले. त्यांना मिळालेल्या पैशातून सून शितल आहेर व तिच्या दोन मुली यांच्या नावावर बँकेत पाच लाख रुपये एफडी करावी. यावरुन सुनेचे सासऱ्यासोबत भांडण झाले. त्यातून श्री. आहेर यांनी शेतात फासी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी ज्योती जाधव यांच्या तक्रारीवरुन सून शितल आहेर तिचे वडील अशोक आव्हाडे व आई कमळाबाई आव्हाडे या तिघांविरुद्ध नांदगाव पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज न्यायाधीश गौड यांच्यासमोर चालले. संशयितांतर्फे युक्तीवाद करताना ॲड. सुधीर अक्कर यांनी शितलचा पती धिरज आहेर याचा जवाब पोलिसांनी नोंदविला नाही. सुनेने सासऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुरावे नाहीत, असा युक्तीवाद केला. युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने तिघा संशयितांची निर्दोष मुक्तता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Water Pipeline Burst: फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची १२०० मिमी जलवाहिनी फुटली; छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT