In a bold daylight burglary in the house of Mangesh Sonawane on Malegaon Road in the city, lockers were broken and clothes and belongings were thrown in an awkward manner.
In a bold daylight burglary in the house of Mangesh Sonawane on Malegaon Road in the city, lockers were broken and clothes and belongings were thrown in an awkward manner. esakal
नाशिक

Nashik News : सटाण्यात दिवसाढवळ्या घरफोडी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

सटाणा (जि. नाशिक) : शहरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. मालेगाव रस्त्यावरील मंगेश सोनवणे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा दोन लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. (Daylight house burglary in satana creates fear among citizens Nashik News)

सटाणा - मालेगाव रस्त्यावरील आनंद मिल शेजारी फोटोग्राफी व्यवसाय करणारे मंगेश सोनवणे हे वास्तव्यास आहेत. सोनवणे बुधवारी (ता.२८) कुटुंबासह बाहेर गेले होते. काम आटोपून सायंकाळी सहा वाजता आई, पत्नी व मुलीला घेऊन ते घरी गेले असता घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसून आले.

तसेच घरातील दोन लोखंडी कपाट तोडून त्यातील साठ हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिणे असा सुमारे दोन लाख ४० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी मालेगाव रस्त्यावरील पर्बत नगरमध्ये मध्यरात्री एकाच वेळी दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या तर एका घरात चोरीचा प्रयत्न केला होता. या चोऱ्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यातच पुन्हा शहरात धाडसी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT