mba.jpg
mba.jpg 
नाशिक

दूरशिक्षणातून एमबीए प्रवेशाच्‍या अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

अरुण मलाणी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या स्‍कूल ऑफ ओपन लर्निंगच्‍या माध्यमातून मास्‍टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्‍ट्रेशन (एमबीए) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवार (ता. १५)पासून सुरू झाली आहे. या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्षास या प्रक्रियेतून प्रवेश दिला जाणार आहे. दूरशिक्षणावर आधारित या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी इच्‍छुक पात्र विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत असेल. 

पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळणार संधी 

पुणे विद्यापीठामार्फत नियमित एमबीए अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्‍ध आहे. परंतु आर्थिक परिस्थिती किंवा नोकरी, व्‍यवसायक विषयक अडचणींमुळे पूर्णवेळ एमबीए शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाने दूरशिक्षणातून एमबीए शिक्षणक्रमाचा पर्याय उपलब्‍ध करून दिला आहे. या शिक्षणक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असताना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवार (ता. १५) पासून सुरू झाली आहे. याकरिता ऑनलाइन स्‍वरूपात संकेतस्‍थळावर अर्ज करत पुढील प्रक्रिया राबवायची आहे. 

या विषयांत एमबीए करता येईल 

ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्‍शियल मॅनेजमेंट, एन्टरप्रेनरशिप, प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, ऑपरेशन ॲन्ड सप्‍लाय चेन मॅनेजमेंट या मुख्य विषयांसह फार्मा ॲन्ड हेल्‍थकेअर मॅनेजमेंट, टुरिझम ॲन्ड हॉस्‍पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, बँकिंग मॅनेजमेंट या विषयांमध्ये एमबीए शिक्षणाची संधी उपलब्‍ध असेल. 

शुल्‍क, पात्रतेच्‍या अटी अशा 

दोन वर्षे कालावधीचा चार सत्रांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. यूजीसीशी संलग्‍न असलेल्‍या कुठल्‍याही विद्यापीठातून किमान पन्नास टक्‍के गुणांसह पदवी शिक्षण झालेले असणे आवश्‍यक आहे. राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्‍के गुणांची अट असेल. तसेच पदवी शिक्षणानंतर किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. राज्‍यातील विद्यापीठांतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता प्रथम सत्राकरिता १५ हजार २०५ रुपये शुल्‍क असेल. तर महाराष्ट्राशिवाय अन्‍य राज्‍यातील विद्यापीठांतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी १६ हजार ७०५ रुपये शैक्षणिक शुल्‍क असेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT