exam23.jpg 
नाशिक

एमएचटी-सीईटी परीक्षेच्या अर्जासाठी अंतिम मुदतवाढ; सीईटी सेलचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या सीईटी परीक्षेच्या नोंदणीची मुदत वाढविण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना या तारखेपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविता येणार आहे. 

ही अखेरची मुदतवाढ असणार

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नियोजित वेळापत्रकानुसार 7 मार्चपर्यंत नोंदणीची मुदत होती, तर एप्रिलमध्ये ही परीक्षा घेतली जाणार होती. आता जुलै-ऑगस्टमध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. परीक्षेला अद्याप बराच अवधी असल्याने यापूर्वी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार आता 1 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी नोंदणी केलेले परंतु संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही या मुदतीत प्रक्रिया पूर्ण करता येईल. मंगळवार (ता. 26)पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यापुढे कुठल्याही स्वरूपाची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही सीईटी सेलमार्फत स्पष्ट केले आहे. 

यापूर्वीची स्थिती 

सीईटीसाठी प्राप्त अर्जांची संख्या : 4 लाख 48 हजार 690 
पूर्णपणे भरलेल्या अर्जांची संख्या : 4 लाख 39 हजार 620 
अपूर्ण स्थितीत असलेले अर्ज : 9 हजार 70 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT