rte admission esakal
नाशिक

RTE Admission : आरटीई प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशास 8 मे पर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

RTE Admission : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या निवड यादीत जिल्ह्यासाठी ४ हजार ७५० बालकांची लॉटरी लागली.

मात्र, आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणी आल्यात. त्यामुळे शिक्षण विभागाने ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बालकांचे प्रवेश होण्यास मदत मिळेल. (deadline for admission of RTE admission eligible children been extended till May 8 nashik news)

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. नाशिकमधील ४०१ शाळांत प्रवेशासाठी ४ हजार ८५४ जागा उपलब्ध असून त्यासाठी तब्बल २२ हजार १२२ अर्जांची नोंदणी झाली आहे.

ही प्रक्रीया झाल्यानंतर राज्यस्तरावर ५ एप्रिल रोजी सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ४ हजार ७५० बालकांची निवड झाली. १३ एप्रिलला आरटीईच्या पोर्टलवर निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना मेसेज येण्यास प्रारंभ झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बहुतांश पालकांना मेसेज प्राप्त झाला आहे. मात्र, आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे अलॉटमेंट लेटर आणि हमीपत्र डाऊनलोड करण्यास अडचण आली. काहींना मेसेज प्राप्त झाले नसल्याने, पोर्टलवर खात्री करण्यासही तांत्रिक अडथळा निर्माण झाला होता.

यावर शिक्षण विभागाकडून प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याने बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी दिला जाईल असे पत्रक प्रसिद्ध केले होते.

त्यानंतर, सोमवारी (ता.२४) विभागाने पत्रक प्रसिद्ध करत ८ मे पर्यंत मुदत दिल्याचे सांगितले आहे. निवड यादीतील बालकांचे प्रवेश प्रवेश घ्यावे असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT