YCMOU Admission  esakal
नाशिक

YCMOU Study Center : 'मुक्‍त’च्‍या अभ्यास केंद्रांच्‍या मान्‍यतेसाठी शनिवारपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

YCMOU Study Center : राज्‍यभरातील पारंपरिक विद्यापीठाची मान्‍यता असलेल्‍या महाविद्यालयांना यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू करण्याची संधी उपलब्‍ध झालेली आहे.

अभ्यास केंद्र सुरू करणे व सध्या कार्यान्‍वित असलेल्‍या अभ्यास केंद्रास नवीन शिक्षणक्रम सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. त्‍यासाठी शनिवार (ता. २२) पर्यंत मुदत दिलेली आहे. (Deadline for recognition of YCMOU study center till Saturday nashik news)

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळल्‍यानंतर कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठाचा विस्‍तार वाढविण्याचे प्रयत्‍न सुरू झालेले आहेत. यापूर्वीच एमबीएची विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविली असताना, आता अभ्यास केंद्रांच्‍या माध्यमातून व्‍याप्ती वाढविण्यावर भर दिला जातो आहे.

मुक्‍त विद्यापीठातर्फे यासंदर्भात सूचना जारी केलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मानव्‍यविद्या व सामाजिकशास्‍त्रे विद्या शाखा आणि वाणिज्‍य व व्‍यवस्‍थापन विद्या शाखा यांच्‍यामार्फत राबविल्‍या जाणाऱ्या शिक्षणक्रमांसाठी नवीन अभ्यास केंद्रे सुरू करण्याचे प्रस्‍ताव मागविले आहेत.

तसेच सध्या कार्यान्‍वित असलेल्‍या अभ्यास केंद्रांवर अधिकचे शिक्षणक्रम सुरू करण्याबाबत ऑनलाइन प्रस्ताव मागविले आहेत. त्‍यानुसार पारंपरिक विद्यापीठाची मान्‍यता असलेले व विहित निकषांची पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने प्रस्‍ताव सादर करण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तांत्रिक अडचणीत सहाय्यता

प्रस्ताव सादर करताना तांत्रिक अडचणी उद्‌भवल्‍यास मुक्‍त विद्यापीठाकडून सहाय्यता करण्याची सुविधा उपलब्‍ध केली आहे. त्‍यासाठी कार्यालयीन दिवसांत सकाळी साडेअकरा ते बारा आणि दुपारी साडेचार ते पाच या वेळेत गुगल मिटद्वारे ऑनलाइन बैठक आयोजित केल्‍या जात आहेत. इच्‍छुक महाविद्यालयांना सहभागासाठी लिंक उपलब्‍ध करून दिली जाते आहे.

‘त्‍या’ महाविद्यालयांना होईल फायदा

पारंपरिक विद्यापीठात गेल्‍या काही शैक्षणिक वर्षांत नव्‍याने मान्‍यता मिळालेली काही महाविद्यालये आहेत. प्रत्‍येक विद्यापीठात सरासरी १० ते १५ महाविद्यालये दर वर्षी सलग्‍नित होत असतात. अशा महाविद्यालयांना मुक्‍तचे अभ्यास केंद्र सुरू करण्याची संधी यानिमित्त उपलब्‍ध होणार आहे. तसेच सध्याच्‍या अभ्यास केंद्रांना विद्यार्थी प्रतिसादानुसार अभ्यासक्रम वाढविण्याची संधी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT