Deadline for registration of B pharmacy till 20 july nashik news esakal
नाशिक

B Pharmacy Admission : बी. फार्मसीच्‍या नोंदणीची २० पर्यंत मुदत; बहुप्रतिक्षित प्रवेश वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

B Pharmacy Admission : इयत्ता बारावीनंतर औषनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या बी. फार्मसीच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाची बहुप्रतिक्षित प्रक्रिया सुरु झालेली आहे.

सीईटी सेलने सविस्‍तर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेकरिता नोंदणीची मुदत २० जुलैपर्यंत दिलेली आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरवात होईल. (Deadline for registration of B pharmacy till 20 july nashik news)

बहुतांश व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली असताना बी. फार्मसीच्‍या प्रवेशाची प्रक्रिया बारगळली होती. एमएचटी-सीईटी या प्रमुख प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होऊन भरपूर दिवस होऊनही प्रवेश प्रक्रिया सुरु होत नसल्‍याने विद्यार्थी व पालकांची घालमेल वाढली होती.

ही प्रतीक्षा मंगळवारी (ता.११) संपली असून, सीईटी सेलने सविस्‍तर वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रक्रियेत सहभागासाठी २० जुलैपर्यंत नोंदणी करता येईल. इ-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीद्वारे कागदपत्रे पडताळणीसाठी २१ जुलैपर्यंत मुदत असणार आहे. २३ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

हरकती नोंदविण्यासाठी २४ ते २६ जुलै अशी मुदत असेल. २८ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून, त्‍याआधारे पुढील प्रवेश दिले जातील. प्रवेशाच्‍या एकूण तीन फेऱ्या घेण्याचे नियोजित आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कॅप राउंडचे वेळापत्रक असे-

* पहिल्‍या कॅप राउंडसाठी नोंदणी----------२९ ते ३१ जुलै

* या फेरीसाठी वाटप यादी प्रसिद्धी-------२ ऑगस्‍ट

* प्रवेश घेण्यासाठीची मुदत------------------३ ते ५ ऑगस्‍ट

* दुसऱ्या कॅप राउंडसाठी नोंदणी------------७ ते ९ ऑगस्‍ट

* या फेरीसाठी वाटप यादीची प्रसिद्धी----११ ऑगस्‍ट

* प्रवेश घेण्यासाठी मुदत--------------------१२ ते १४ ऑगस्‍ट

"औषधनिर्माणशास्‍त्र पदवी व पदविका अभ्यासक्रमांच्‍या नोंदणी सध्या सुरु आहेत. या क्षेत्रात संशोधनाला वाव असून, करिअरचे चांगले पर्याय उपलब्‍ध आहेत. विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा निर्णय न घेता, तातडीने नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्‍हावे." - प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, एमजीव्‍ही फार्मसी महाविद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

Commonwealth Games 2026: १० पैकी १०! भारताच्या बॉक्सर्सनी इतिहास-भूगोल बदलला; १० 'सुवर्ण' पदकांवर दावा ठोकला... आज फैसला

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT