Exam esakal
नाशिक

सेट परीक्षा अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदत

अरुण मलानी


नाशिक : सहाय्यक प्राध्यापकपदाकरीता महाराष्ट्र राज्‍य पात्रता परीक्षा (SET) करीता अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. याअंतर्गत इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना गुरुवार (ता.१०) पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. येत्‍या २६ सप्‍टेंबरला परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेच्‍या वेळापत्रकाची घोषणा केली होती. त्‍यानुसार गेल्‍या १७ मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. (deadline for set exam application is 10 june)

महाराष्ट्र व गोवामध्ये ही परीक्षा होणार आहे. सध्या जारी केलेल्‍या वेळापत्रकानुसार येत्‍या गुरुवार (ता.१०) पर्यंत ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज दाखल करता येईल. याच मुदतीत अर्ज भरलेल्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे निर्धारीत शुल्‍क भरायचे आहे. तर ऑनलाइन अर्जात दुरुस्‍ती करण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत दिली जाणार आहे. या मुदतीनंतर अर्जात कुठल्‍याही स्‍वरूपाचे बदल करता येणार नसल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. १६ सप्‍टेंबरला प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाणार आहे. २६ सप्‍टेंबरला महाराष्ट्र व गोव्‍यातील परीक्षा केंद्रांवर सेट परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.


पंधरा केंद्रांवर परीक्षेचे संयोजन

पुणे विद्यापीठाने परीक्षा केंद्रांची यादी संकेतस्‍थळावर उपलब्‍ध केली आहे. त्‍यानुसार राज्‍यातील पंधरा शहरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. यात नाशिकसह मुंबई, पुणे, कोल्‍हापूर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, नगर, धुळे यांसह गोव्‍यातील परीक्षा केंद्राचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Women: मला न कळवता तीने गोवा सोडलं... गोकर्ण जंगलाच्या गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा पती प्रथमच समोर, धक्कादायक माहिती

Bokaro Naxal Encounter : २५ लाखाचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठार! सुरक्षा दल-नक्षलवाद्यांत तीव्र गोळीबार; कोब्रा बटालियनचा जवानही शहीद

Nagpur News : विद्यार्थी नसलेल्या तीनशे महाविद्यालयांना वेतनासाठी कोट्यवधींचे अनुदान; जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश

Mahadev Munde Case: आरोपींना अटक नाहीच, Dnyaneshwari Munde यांनी उचललं टोकाचं पाऊल | Beed News

Nagpur Rain : पूर नुकसानीचा अहवाल थंडबस्त्यातच; नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदतीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT