lasalgaon baby death.jpg 
नाशिक

हसत खेळत चिमुकली पाण्याच्या टबजवळ गेली...अन् थोड्या वेळातच भयाण शांतता!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लासलगाव जवळील ब्राह्मणगाव (विंचूर) येथे बाथरुमजवळ पाण्याने भरलेल्या टपात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ब्राह्मणगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी घडली दुर्देवी घटना...

ब्राह्मणगाव येथे पाच ते आठ दिवसाआड नळाला पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे घरातील लहान-मोठे संपूर्ण भांड्यांमध्ये पाण्याचा साठा केला जातो. आज सकाळी पाणी आले. त्यामुळे घरातील सर्व भांड्यांमध्ये पाणी भरण्यात आले. घराबाहेरील बाथरुमजवळ 25 लिटरचा टपही पाण्याने भरण्यात आला होता. दरम्यान, गीताच्या आईचे घरातील काम सुरु असताना गीता ही एकटीच खेळत होती. ती खेळताना घराबाहेर असलेल्या बाथरुमजवळ गेली. टपात असलेल्या पाणीसोबत खेळत असताना चिमुकल्या गीतेचा तोल गेला आणि ती टपात पडली. यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याने तिचा टपातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली 

आईला याची साधी कल्पनाही नव्हती...अचानक आक्रोश

गीताच्या आईला याची साधी कल्पनाही नव्हती. गीताचा आवाज येत नसल्याने आई तिला शोधू लागली. मात्र गीता कुठेही दिसली नाही. अखेर गीताला शोधताना ती आरडाओरड करु लागली. यावेळी घराच्या शेजारच्यांनीदेखील गीताला शोधायला सुरुवात केली. त्यावेळी बाथरुमजवळ असलेल्या टपात गीताचे पाय दिसले. तिला टपातून बाहेर काढण्यात आले. यावेळी तिची हालचाल बंद झाली होती. तिला तत्काळ लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण आहेर यांनी तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी चिमुकल्या गीताला मृत्यू झाल्याची घोषणा केली. या घटनेमुळे गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ब्राह्मणगावतही या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन वर्षाच्या गीताच्या पार्थिवाचे शवविच्छेदनानंतर अंत्यविधी करण्यात आला.

एखादं गाणं सुरु झालं की त्यावर गीता नाचत, गात...

ब्राह्मणगावच्या (विंचूर) गायत्री आणि खंडू गवळी यांना दोन लहान मुली होत्या. त्यातील पहिली मुलगी ही पाच वर्षांची आहे. तिचं ज्ञानेश्वरी असं नाव आहे. ज्ञानेश्वरीच्या जन्मानंतर तीन वर्षांनी लहान मुलगी गीताचा जन्म झाला. या दोन्ही मुली गवळी कुटुंबात अतिशय लाडक्या होत्या. दोन्ही मुली अंगणात खेळत, टीव्हीवर आणि मोबाईलवर सिनेमातील एखादं गाणं सुरु झालं की त्यावर नाचत, त्यामुळे गवळी कुटुंबामध्ये मोठं आनंदाचे वातावरण होतं. मात्र आज (24 फेब्रुवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन वर्षाची चिमुकली गीताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत मुलीचे नाव गीता खंडू गवळी असं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT