After the death of Mrdungacharya, the wife was starved esakal
नाशिक

Nashik News : मृदुंगाचाऱ्यांच्या निधनानंतर पत्नीवर उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वारकरी संप्रदायात मृदंगाचार्य हिरामण हुलगुंडे यांनी नाव मिळवलं. हरिनाम सप्ताहात पखवाज वादनाने भक्तीमय वातावरण निर्मिती करणारे श्री. हुलगुंडे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्यानंतर पत्नीवर उपासमारीची वेळ आली आहे. आता त्यांची कन्या आईसमवेत राहतो.
आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेल्या श्री. हुलगुंडे यांनी आपले आयुष्य कीर्तन, भजनामध्ये वाहून घेतले. कोने (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील पडक्या अंगणवाडीमध्ये पत्नी गंगूबाई यांच्यासमवेत राहत ते मृदंगाचार्य झालेत. (Death of Mrudungacharya Wife starved Her sad daughter of Hiraman Hulgunde family lives her mother Nashik News)

राज्यात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. नाशिकमधील काळाराम मंदिरातील हरिनाम सप्ताहात श्री. हुलगुंडे हे अग्रेसर असायचे. घर, शेती नसल्याने आयुष्यभर ते फिरत राहिलेत. २००९ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला.

दोन्ही हात निकामे झाले. आता पखवाज वाजविणे शक्य नसल्याने ते पडक्या घरात पत्नी व दोन मुलींसह राहू लागले. दोन वेळचे अन्न मिळणे मुश्कील झाले. मात्र मदत मिळाली नाही. त्र्यंबकेश्‍वर पंचायत समितीमध्ये वयोवृद्ध लोककला मानधन योजनेचा अर्ज केला. त्याचाही काही उपयोग झाला नाही.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

अखेर पत्नी मजुरी करून घर चालवू लागल्या.
वयाच्या ६२ व्या वर्षी २०१८ मध्ये पुन्हा श्री. हुलगुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. घरकुल योजनेत त्यांना घर मिळाले. पण आजपर्यंत घरात ना लाइट ना पाणी. त्यांच्या एका मुलीचे निधन झाले, तर दुसरी आईसोबत राहते. आता गंगुबाईंचे वय झाल्याने काम होत नसल्याने मुलगी मजुरी करून आईला सांभाळते.
"भक्तीसाठी वडिलांनी झोकून दिले. पण पैसा कमावला नाही. ते आजारी पडल्यावर कुणी बघावयास आले नाही. वयोवृद्ध लोककला मानधन योजना कागदावर असून आम्हाला कोणताही फायदा झाला नाही. आता आईला कसे जगावे? हा प्रश्न पडला आहे. मला नोकरी मिळाल्यास आईला सांभाळणे शक्य होईल."
- सारिका हुलगुंडे, कलावंतांची मुलगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT