corona niphad.jpg
corona niphad.jpg 
नाशिक

निफाडला कोरोनाबळी दोनशे पार; गृहविलगीकरणात असलेले रुग्ण ठरताहेत ‘सुपर स्प्रेडर’!

दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. दरदिवशी शेकडो कोरोनाबाधितांची भर पडत आहे. निफाड तालुक्यात आतापर्यंत २३८ बाधितांचा बळी गेला आहे. या जीवघेण्या आजारावर रुग्णांनी मात केली असली तरी सद्यःस्थितीत दोन हजार ५९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची धोकादायक स्थिती आहे. 

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला

दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून, या कालावधीत सुमारे चार हजार ३४५ जणांना कोरोना संसर्ग झाल्याच्या आकडेवारीमुळे खळबळ उडाली आहे. अशात या दोन महिन्यांत १२४ बाधितांना जीव गमवावा लागला असल्याची भयभीत करणारी माहिती समोर आली आहे. त्या मुळे तालुक्यातील जनतेत भीतीचे वातावरण असले तरी रस्त्यावरील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बाजारात केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू असताना लोक नाहक रस्त्यावर गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. परिणामी, संसर्गाला आळा घालण्यात पाहिजे तसे यश येत नसल्याचे दिसून येते. 

गृहविलगीकरणात असलेले रुग्ण ठरताहेत ‘सुपर स्प्रेडर’!

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येऊनही पिंपळगाव बसवंत, ओझर, निफाड, लासलगाव या बाजारपेठांमध्ये हे ‘सुपर स्प्रेडर’ बिनदिक्कत फिरत आहे. गृहविलगीकरणात असलेले रुग्ण नियमांचे पालन करत नसल्याने या आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याची ओरड सुरू आहे. त्या मुळे नागरिकांनी सामाजिक व कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवून योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनस्तरावरून कायदेशीर कारवाई झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. अन्यथा या जीवघेण्या आजाराचा प्रकोप वाढून सर्वत्र हाहाकार माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

रस्त्यावर नाहक गर्दी करीत नियमांची सर्रास पायमल्ली.

दरम्यान, या आजारावर कवचकुंडल ठरणारी प्रतिबंधक लस दिली जात असली तरी लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केद्रांवर गर्दी उसळत आहे. या गर्दीवर नियंत्रणासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याने या ठिकाणी सामाजिक अंतर, तसेच इतर नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे.

लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता. 

निफाड तालुक्यातील विविध केंद्रांवर प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. परंतु सद्यःस्थितीत अत्यल्प लसीचा साठा उपलब्ध आहे. अवघे तीन हजार डोस शिल्लक आहेत. दोन ते तीन दिवस लसीकरण होऊ शकते. त्या मुळे शासनस्तरावरून आवश्‍यक प्रमाणात लसीचा साठा वेळेत उपलब्ध न झाल्यास लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

निफाड तालुक्यात कोरोनाची आजपर्यंतची स्थिती 

एकूण बाधित : आठ हजार ७४५ 
बरे झालेले रुग्ण : सहा हजार ४५५ 
उपचार सुरू असलेले : दोन हजार ५९ 
एकूण मृत्यू : २३८  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT