COVID Center esakal
नाशिक

Nashik News : शहरातील खासगी कोवीड सेंटर गुंडाळण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात कोव्हीड संसर्गजन्य परिस्थिती निवळल्याने व नागरिकांचीदेखील त्याच प्रकारची मानसिकता असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खासगी ठिकाणी उभारलेले कोविड सेंटर गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. (Decision to close private covid centers in city Nashik News)

मार्च २०२०पासून नाशिक महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. पुढे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने खासगी कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये अंबड व ठक्कर डोम, तसेच मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये असे सेंटर उभारण्यात आले.

तेथे महापालिकेने ऑक्सिजनसह रुग्णांना जेवण, औषधे, उपचाराच्या सोयी सुविधा पुरविल्या. त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट सौम्य स्वरूपात ठरली. चौथ्या लाटेची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. तसे संकेत देखील मिळाले. त्या अनुषंगाने महापालिकेने इन्फ्रास्ट्रक्चर जसेच्या तसे ठेवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

परंतु, आता शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्याशिवाय कोरोना संदर्भातील निर्बंधदेखील पाळले जात नाहीत. सरकारी यंत्रणांकडून कोव्हीड संदर्भात फारसे कठोर असे नियम नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर खासगी ठिकाणी उभारलेले कोविड सेंटर गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी कोविड सेंटरमधील पायाभूत सुविधांची देखभाल दुरुस्ती, विद्युत बिल, तसेच अन्य खर्च महापालिकेला करावे लागत आहे. हा खर्च वाया जाणारा असल्याने खासगी कोविड सेंटर बंद करण्याचा तसेच, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये असलेले कोविड सेंटरचे स्वरूप मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब नागरगोजे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुण्यातील चव्हाण वाडात चिमण्या गणपती जवळ आगीची घटना

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

SCROLL FOR NEXT