Gangapur dam  Sakal
नाशिक

नाशिक : धरणातून विसर्गामुळे पाणी कपात मागे, सोमवारी होणार निर्णय

विक्रांत मते

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे ८० टक्के भरून नद्यांमध्ये पाणी सोडण्याची वेळ आल्याने अखेरीस प्रशासनाने आठ दिवसातून एकदा सुरू केलेली पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (ता. २) पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीनंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. (Decision to withdraw water cut due to filling of water supply dam 80 percent)

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरण परिसरात पुरेसा पाऊस न पडल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेने कपातीचा निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून पाणी स्थितीचा आढावा घेऊन आठ दिवसातून संपूर्ण एक दिवस कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी बुधवार निश्‍चित करण्यात आला.

दोन आठवड्यांपासून शहरात पाणी कपात सुरू आहे. परंतु, धरण परिसरात पावसाने जोर धरल्याने गंगापूर धरण ८० टक्के, तर मुकणे धरणाचा साठा ७० टक्क्यांच्या वर पोचला आहे. दारणा धरण यापूर्वीच भरले आहे. गुरुवारी गंगापूर धरणातून २००० क्यूसेस वेगाने नांदुरमध्यमेश्‍वरकडे पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली असताना कपातीचा निर्णय मागे घेतला जात नसल्याने प्रशासनावर टीका होत होती. त्यापार्श्‍वभूमीवर आता सोमवारी पाणी कपातीचा आढावा घेऊन निर्णय मागे घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(Decision to withdraw water cut due to filling of water supply dam 80 percent)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT