Nashik City
Nashik City Google
नाशिक

कडक निर्बंधाने रोखले हवा प्रदूषण! शहरातील प्रदूषणात झपाट्याने घट

विक्रांत मते


नाशिक : कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) वाढत्या वेगामुळे एप्रिल व मेमध्ये लागू केलेल्या कडक लॉकडाउनचे (Lockdown) जसे नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. तसेच निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक बाबीदेखील समोर आल्या आहेत. त्यात हवा प्रदूषण (air pollution) झपाट्याने कमी झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक (Air quality index) सरासरी तीसवर स्थिरावला आहे. (Decrease in air pollution in Nashik city during lockdown)

हवा प्रदूषणात घट

हवेतील सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड व धूलिकणाचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे अहवाल सांगतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात सातपूर येथील उद्योगभवन, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालय, सातपूर औद्योगिक वसाहतीमधील व्हीआयपी कंपनी, नाशिक-पुणे महामार्गावरील आरटीओ कॉलनी व महापालिका मुख्यालय या पाच ठिकाणी हवा, ध्वनिप्रदूषण मापक यंत्रे बसविली आहे. त्या माध्यमातून हवा व प्रदूषणाची मासिक स्थिती समजते. सर्वसाधारण परिस्थितीत हवा व ध्वनिप्रदूषणाची पातळी सरासरी उंचावलेली आढळून येते. परंतु १३ एप्रिल ते १३ मे या कालावधीत हवा प्रदूषणात घट झाल्याचे दिसून येत असून, चांगली स्थिती असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

हवेची गुणवत्ता चांगली

हवेत सल्फर डाय ऑक्साईड व नायट्रोजन डाय ऑक्साईडचे प्रमाण ८० मायक्रोगॅम पर क्युबिक मीटरपेक्षा अधिक नसावे, तर धूलिकण १०० मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक नसावेत, असे मानांकन ठरविले आहे. या तिन्ही घटकांचा विचार करता उद्योगभवन येथे हवा गुणवत्ता निर्देशांक ३४ आढळून आला आहे. केटीएचएम महाविद्यालयाजवळ २६, तर औद्योगिक वसाहतीत ३९, आरटीओ कॉलनी येथे ६९, तर महापालिका मुख्यालयात ४४, असा हवा निर्देशांक आढळून आला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० चांगला, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, तर २०१-३०० वाईट ३०० च्या पुढे अतिशय घातक परिस्थिती अशी नोंद घेतली जाते.


वाहतूक वळविल्याचा परिणाम

शहरातील महत्त्वाच्या पाच ठिकाणी हवेतील सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण आरटीओ कॉलनी येथे सर्वाधिक पंधरा मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर आढळले आहे. नायट्रोजनचे प्रमाणदेखील याच भागात सर्वाधिक २३ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर आढळले आहे. धूलिकणाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ६९ पार्टिकल एवढे आढळले आहे. परंतु दर्शविण्यात आलेले निर्देशांक सरासरीपेक्षा देखील कमी आहे. पुणे महामार्गावरून शहरात येणारी अवजड वाहनांची वाहतूक आरटीओ कॉलनी येथून औरंगाबाद महामार्गाकडे वळविल्याने येथे काही प्रमाणात प्रदूषण आढळून येत आहे.

(Decrease in air pollution in Nashik city during lockdown)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT