dilip datir esakal
नाशिक

जिद्दीच्या जोरावर मनसे जिल्हाध्यक्षांनी केली पदवी संपादन

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : राजकारणात जेव्हा प्रवेश झाला त्यावेळी त्यांच्या एका राजकीय सहकार्याने त्यांचे शिक्षण विचारले. बारावी नापास असे सांगताच त्या सहकार्याने त्यांची चार चौघात ‘खिल्ली’ उडविली. त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांना अपमानित झाल्यासारखे वाटले. मग त्यांनी ठरवले की एक दिवस पदवी पूर्ण करणारच आणि ती शपथ त्यांनी पूर्ण करून दाखविली.(degree-obtained-by-MNS-district-president-nashik-marathi-news)

जिद्द, चिकाटीच्या जोरावर मनसे जिल्हाध्यक्षांनी केली पदवी संपादन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी राज्यशास्त्र या विषयात पदवी संपादन करत स्वप्न पूर्ण केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. दिलीप दातीर यांनी राजकीय कारकीर्द सुरु ठेवत असताना जिद्द व मेहनतीने पदवीपर्यंतचे शिक्षणदेखील पूर्ण केले आहे. बुधवारी (ता.९) त्यांना पदवी संपादन केल्याची आनंदाची बातमी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्यांनी केवळ पदवी पास केली नसून फस्ट क्लास विथ डस्टिंक्शन मिळविले आहे. ही बाब विशेष म्हणावी लागेल.

शपथ पूर्ण

दिलीप दातीर यांचा राजकारणात प्रवेश झाला त्यावेळी त्यांच्या एका राजकीय सहकार्याने त्यांचे शिक्षण विचारले. बारावी नापास असे सांगताच त्या सहकार्याने त्यांची चार चौघात ‘खिल्ली’ उडविली. त्यावेळी श्री. दातीर यांना अपमानित झाल्यासारखे वाटले. मग त्यांनी ठरवले की एक दिवस पदवी पूर्ण करणारच आणि ती शपथ त्यांनी पूर्ण करून दाखविली. ज्यांनी माझी खिल्ली उडवली आज ते मला गुरूसमान आहे, असे ते उदार मनाने सांगताना दिसतात. ही बाब विशेष म्हणावे लागेल.

यापुढे शिक्षण सुरूच ठेवणार

घरामध्ये सात बहिणीच्या पाठीवर एकुलता एक असल्याने व्यवसायाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण अपूर्ण राहीले. राजकारणात प्रवेश केल्यानंतर पदवी पूर्ण करण्याचे ठरविले. जोमाने व चिकाटीने अभ्यास केला व यशस्वी झालो. यापुढे शिक्षण सुरूच ठेवणार आहे. - दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष, मनसे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT