students in tension due to delay in 11th admission latest marathi news
students in tension due to delay in 11th admission latest marathi news esakal
नाशिक

प्रवेशातील विलंबाने विद्यार्थ्यांच्‍या पोटात गोळा; पालकांचीही वाढली चिंता

अरूण मलाणी

नाशिक : दहावीचा निकाल जाहीर होऊन महिन्‍याभरापेक्षा अधिक कालावधी झालेला असताना अद्यापपर्यंत अकरावी प्रवेशाची (11th admission) प्रक्रिया सुरु झालेली नाही.

प्रवेशात होत असलेल्‍या विलंबामुळे अभ्यासक्रम (Syllabus) प्रभावित होण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे. जेईई, नीट सारख्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या पोटात गोळा येत असून पालकांचीही चिंता वाढली आहे. (Delay in admission tensed students nashik latest Marathi news)

विविध राष्ट्रीय व राज्‍यस्‍तरीय प्रवेश परीक्षांकरीता अकरावी व बारावीच्‍या संयुक्‍त अभ्यासक्रमावर प्रश्‍न विचारले जात असतात. त्‍यामुळे बारावीप्रमाणे अकरावीचा अभ्यासक्रमही महत्त्वाचा असतो. इयत्ता दहावीचा निकाल १७ जूनला जाहीर झाला होता.

महिनाभर उलटूनही अकरावीचे प्रवेश अद्यापपर्यंत झालेले नाही. विशेषतः विज्ञान शाखेत प्रवेशास इच्‍छुक विद्यार्थ्यांची चिंता यामुळे वाढलेली आहे. विलंब झाल्‍याने अभ्यासक्रम अध्ययनात घाई-गडबड होण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

आणखी सुमारे एक महिन्‍याचा कालावधी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जाणार असल्‍याने ऑगस्‍ट अखेरीस अध्ययन प्रक्रिया सुरु होण्याचा अंदाज आहे. यामुळे शैक्षणिक नियोजित कोलमडण्याचीही शक्‍यता वर्तविली जात आहे.

दरम्‍यान प्रवेश निश्‍चितीची प्रतीक्षा न करता अनेक विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणी लावत अभ्यासाला सुरवात केलेली आहे. अनेक शिकवणी चालकांकडून अध्ययन प्रक्रिया सुरु केलेली आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांची आघाडी

दहावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर नाशिक महापालिका क्षेत्रातच केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात प्रवेश निश्‍चित झालेले असल्‍याने या विद्यार्थ्यांनी अभ्यासात आघाडी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Viral Video: "इस्लाम हा एक न्याय्य धर्म, तो समाजावर लादला पाहिजे..." विद्यार्थ्याच्या खळबळजनक विधानामुळे सोशल मीडिया पेटले

X Overpayment Issue : इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांचा पगार मागितला परत; कोट्यवधींच्या रक्कमेसाठी काढली नोटीस,जाणून घ्या काय आहे प्रकरण

Babar Azam: 'मी असतो तर त्वरित कॅप्टन्सी सोडली असती...', माजी कर्णधाराने बाबरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT