Mahanirmiti generates half of their capacity e-sakal
नाशिक

महानिर्मितीचे 11 संच बंद! मागणीअभावी निम्म्या क्षमतेने वीजनिर्मिती सुरू

विजेची मागणी कमी झाल्याचे कारण देत सहा संचांना झीरो शेड्यूल(zero schedule) देण्यात आले आहे, तर तांत्रिक(technical) कारणास्तव पाच, असे ११ संच सध्या बंद आहेत.

नीलेश छाजेड

एकलहरे (जि. नाशिक) : लॉकडाउन(lockdown) दुसऱ्या टप्प्यात विजेची मागणी कमी झाल्याचे कारण देत सहा संचांना झीरो शेड्यूल(zero schedule) देण्यात आले आहे, तर तांत्रिक(technical) कारणास्तव पाच, असे ११ संच सध्या बंद आहेत. महानिर्मितीची औष्णिक संचांमधून (Mahaniriti Thermal sets) निर्मिती गुरुवारी (ता. ६) सायंकाळी चार हजार आठशे मेगावॉटवर(mega watt) आली आहे. (Demand for electricity declined in the lockdown)

अकरा संच बंद

चंद्रपूरच्या संच सात जनरेटरमध्ये(generator) बिघाड झाल्याने संच बंद आहे. संच चार वार्षिक देखभालीसाठी व पाच तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत. भुसावळ संच तीन व परळी येथील संच सहा व सात झीरो शेड्यूलमध्ये बंद आहेत. कोराडी संच सहाचे नूतनीकरण(Renewal) व आधुनिकीकरणाचे(Modernization) काम झाल्यानंतरही या संचातून अपेक्षित निर्मिती होत नसल्याचे चित्र आहे. एकंदरीत कोट्यवधींचा खर्च वाया गेला आहे. कोराडी संच सहा व सात पण झीरो शेड्यूलमध्ये बंद आहेत. संच नऊ हा बॉयलर ट्यूब (Boiler tube) लिकेजमुळे बंद होता. नाशिकच्या एक संचाचा कोळसा दोन वर्षांपासून खासगी वीज केंद्राला वळविण्यात आला आहे. संच चार व पाचमधून सध्या वीजनिर्मिती सुरू आहे.

कमी क्षमतेने वीजनिर्मिती

नाशिक ६३० मेगावॉट क्षमतेपैकी ३६४ मेगावॉट, कोराडी क्षमता २,४०० मेगावॉट निर्मिती ९४० मेगावॉट, खापरखेडा १३४० पैकी ८७७ मेगावॉट, पारस क्षमता ५०० मेगावॉट निर्मिती ४२१, परळी ७५० पैकी १८१ मेगावॉट, चंद्रपूर क्षमता २,९२० मेगावॉट निर्मिती १,१६५, भुसावळ १,२१० मेगावॉट निर्मिती ९२७ मेगावॉट, अशी क्षमतेपेक्षा अनेक वीज केंद्रांतून निम्म्याहून अधिक कमी क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी राज्याची विजेची मागणी २२,३११ मेगावॉट होती, तर राज्याच्या सर्व स्रोतांतून १४,९९९ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती. केंद्रातील हिस्सा ७,०१६ होता. त्याहून अधिक ७,३०० मेगावॉट वीज घेऊन गरज भागविली जात आहे.

वीजनिर्मिती दर कमी

नाशिकचा वीजनिर्मिती दर जास्त पडतो, ही कायम ओरड असते. या महिन्याच्या एमईआरसीने जे दर जाहीर केले, त्यात नाशिकचे टाटा, डहाणू, कोराडी संच सहा व सात, सोलापूरच्या तुलनेत बरेच कमी आहेत. नाशिकचा वीजनिर्मिती दर तीन रुपये ३५ पैशापर्यंत कमी करण्यात स्थानिक प्रशासनाला यश मिळाले आहे. तरीही नाशिकवर अन्याय का, हा प्रश्न कायम आहेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT