Demand for Malegaon Namaji hat in Saudi Arabia esakal
नाशिक

मालेगावच्या नमाजी टोपीला सौदी अरेबियात मागणी | Nashik

जलील शेख

मालेगाव (जि. नाशिक) : शहराला कापड निर्मितीचे हब मानले जाते. येथे महिन्याला लाखो मीटर कापड तयार होते. कापडानंतर येथील लुंगी, टोपी यांना विदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मालेगावच्या नमाजी टोपीने भारतातून चायना टोपीला हद्दपार केले आहे. सलग दोन वर्षांपासून सर्वत्र लॉकडाउन होते. देशात सर्वत्र मुस्लीम बांधवांनी कोरोनाचे नियम पाळून रमजान ईद (Ramzan Eid) व बकरी ईदची नमाज घरीच पठण केली. निर्बंध शिथिल झाल्याने या वेळी नागरिकांमध्ये उत्साह आहे.

कपडे खरेदीबरोबरच मालेगावच्या शामी टोपीची खरेदी केली जात आहे. येथे २००१ पासून टोपी बनविण्यास सुरवात झाली. येथील टोपी हॅन्डमेड व टिकाऊ असल्याने त्याची मागणी बाजारात जास्त आहे. महिन्याकाठी येथे दहा हजार टोपी तयार होतात. कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या भीतीने व्यापाऱ्यांनी टोपीचा माल तयार केला नाही. सध्या सगळ्या बाजारपेठ व रमजान महिन्यात टोपीला मागणी वाढली आहे. येथील टोपी सौदी अरेबिया (Saudi Arabia) व तेथून सर्वत्र माल पाठवला जातो. त्याबरोबरच मुंबई, कोलकाता, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हैदराबाद, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान यासह अनेक राज्यात माल विक्रीला जातो. मालेगावच्या टोपीबरोबरच येथे इंडोनेशिया, तुर्की, बांगलादेश, पाकिस्तान आदी टोप्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

रमजान महिन्यात नवीन कपड्यांबरोबरच नवीन टोपी, रुमाल नागरिक घेतात. शहरात ५० पेक्षा अधिक दुकाने लागली आहे. मालेगावात हाताने तयार होणाऱ्या टोपी शहरातील नवीन वस्ती सरदारनगर, बागे कासीम, स्लाटर हाऊस यासह विविध भागात महिलांकडून टोपी तयार केली जाते. येथे २५०० ते तीन हजार महिला टोपी तयार करून कुटूंबाच्या गाडा हाकतात.

प्रकार दर

शामी टोपी - १५० रुपये

इंडोनेशियाची टोपी - ३० ते ५० रुपये

बांगलादेशीची टोपी - १०० ते १५० रुपये

तुर्कीची टोपी - १०० ते १५० रुपये

"लॉकडाउनच्या भीतीमुळे अनेक व्यापाऱ्यांनी माल तयार केला नाही. बाजारात टोपीला अचानक मागणी वाढल्याने सध्या सर्वत्र टोप्यांचा तुटवडा आहे."

- अन्सारी आरिफ सईद, टोपी व्यापारी, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT