Facebook
Facebook esakal
नाशिक

Nashik : बनावट फेसबुक वरून पैशांची मागणी; सायबर सेलकडे करावी तक्रार

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : बनावट फेसबुक प्रोफाइल (Facebook Profile) बनवून मित्र-मैत्रिणीला, तसेच नातेवाइकांना रिक्वेस्ट (Request) पाठवली जाते व त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून अडचणीत असल्याचे सांगून पैसे मागितले जातात. त्याद्वारे अनेकांच्या फसवणुकीची (Fraud) शक्यता असते. असे बनावट खाते (Fake Account) उघडल्याचे लक्षात येताच सायबर सेलकडे (Cyber Cell) तक्रार करावी, जेणेकरून ते अकाउंट बंद करून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाते. (Demand for money from fake Facebook Report to Cyber ​​Cell Nashik cyber crime News)

बहुतांश जणांकडे आज अँड्रॉइड मोबाईल (Android Mobile) आहे. बँकिंगच्या कामासाठी फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter), गुगल पे (Google pay), फोन पे (Phone Pay), ई-मेल (Email) यांसह इतर माध्यमांचा सर्रास वापर केला जाता. मात्र, या माध्यमांचा काही जण गैरफायदा घेऊन फसवणूक करतात. त्याचे धोकेही वाढले असून, मित्र अडचणीत असल्याने अनेक जण मदतीच्या उद्देशाने पैसेही पाठवतात; परंतु पैसे न पाठवता थेट संबंधित मित्रास संपर्क करून त्याला अडचण आहे का, अशी विचारणा करावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही. त्यानंतर संबंधित व्यक्तीने सायबर सेल विभागात याप्रकरणी तक्रार केली, तर बनावट अकाउंट बंद केले जाते. त्यामुळे होणारी फसवणूक टाळता येते. नागरिकांनीदेखील सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बनावट खात्याद्वारे फसवणूक
एखाद्या व्यक्तीचे फेसबुक पेजवरील फोटो व संपूर्ण माहिती आहे तशी कॉपी करून बनावट फेसबुक पेज तयार केले जाते. त्यानंतर संबंधितांच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मैत्री झाल्यानंतर दोन किंवा दहा दिवसांनंतर आजारी असल्याचे सांगून किंवा आर्थिक अडचण अल्याचे सांगत पैशाची मागणी केली जाते. आपले बनावट फेसबुक खाते उघडण्यात आले आहे. त्यावरून पैशाची मागणी केली आहे. याची माहितीही संबंधितास नसते. ज्यावेळी कोणीतरी संपर्क करतो, त्या वेळी त्याच्या ही बाब लक्षात येते. त्यामुळे पैसे पाठविण्याऐवजी दक्षता घेणे व संपर्क साधणे गरजेचे आहे.

अशी घ्यावी काळजी
ज्यांना बनावट फेसबुक अकाउंटवरून रिक्वेस्ट गेली आहे. त्याच्याकडून त्या अकाउंटची लिंक मागून घ्या. त्या प्रोफाइलवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. तुमच्या नावासमोर ‘फर्स्ट सपोर्ट’ किंवा ‘रिपोर्ट प्रोफाइल’ हे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. यासंदर्भात सायबर सेल विभागात तक्रार करा. तसेच आपल्या मुख्य खात्यावर यासंदर्भात बनावट अकाउंट उघडून पैसे मागत असल्याचे जाहीर करावे, जेणेकरून मित्र जागरूक होतील व फसवणूक होणार नाही.

"नागरिकांनी फेसबुकसंदर्भात पैशाची मागणी केल्यानंतर यासंदर्भात माहिती घेतली पाहिजे, तसेच ऑनलाइन गुन्हे टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करू नये, हनीट्रॅपचेही प्रकार वाढले आहेत. बँक खात्यासंदर्भात माहिती देणे टाळावे. फोन पे, गुगल पे नंबर खरा आहे का, याची खात्री करावी, तसेच संशय आल्यास सायबर सेलकडे तक्रार करावी."
- सचिन पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT