Mahametro Sakal
नाशिक

महामेट्रो कंपनीकडून महापालिकेकडे प्रत्येकी दहा एकर जागेची मागणी

मिळकत विभागाला तातडीने जागेचा शोध घेण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

मिळकत विभागाला तातडीने जागेचा शोध घेण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

नाशिक : शहरात प्रस्तावित टायरबेस मेट्रो रेल्वेसाठी महामेट्रो (mahametro) कंपनीने महापालिकेकडे (nashik carporation)डेपो व कोचेससाठी नाशिकरोड(nashik road) व गंगापूर रोड येथे प्रत्येकी दहा एकर जागेची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार मिळकत विभागाला तातडीने जागेचा शोध घेण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी शहरात टायरबेस मेट्रो प्रकल्प राबविला जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी २०९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या खर्चासाठी केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये, तर १, १६१ कोटी कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहे. राज्य सरकार, सिडको व महापालिका २५५ कोटी रुपये देणार आहे. महापालिकेकडे निधी नसल्याने प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देणार आहे. २०२३ पर्यंत मेट्रो प्रकल्पाची मुदत असली तरी उद्‌घाटन लांबले आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात एकाच वेळी प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन होत असल्याची चर्चा आहे. त्यातून विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली नसली तरी महामेट्रोने पत्राद्वारे महापालिकेकडे दहा एकर जागा डेपोसाठी मागितली आहे. त्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नाशिक रोड व गंगापूर रोड या दोन ठिकाणी प्रत्येकी १० एकर जागेची मागणी नोंदविण्यात आली आहे. मिळकत विभागाकडून नाशिक रोड, गंगापूर रोडसह चेहेडी येथे जागेचा शोध घेतला जात आहे.

महापालिकेकडे निधी नसल्याने जागा देण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार महामेट्रोने केलेल्या मागणीनुसार डेपो व कोचसाठी नाशिक रोड व गंगापूर येथे दहा एकर जागा दिली जाणार आहे.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT