Demand to take action against the hotel where 11 people were detained Nashik crime news 
नाशिक

११ जणांना डांबून ठेवणाऱ्या 'त्या’ हॉटेलवर गुन्हा दाखल करा; बाळा दराडेंची पोलिस आयुक्तांकडे मागणी

राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (नाशिक) : पाथर्डी फाटा भागातील एका नामांकित हॉटेलमध्ये कथितरित्या डांबून ठेवलेल्या एका युवतीने शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांना फोन करून रडक्या व घाबरलेल्या आवाजात हॉटेल प्रशासने आम्हाला रात्री मारहाण केली असून, आम्हाला काम सोडून आमच्या गावी परत जायचे आहे अशी कैफियत मांडली होती.  त्यानंतर प्रकरण आता  चांगलेच तापताना दिसत आहे. 

डांबून ठेवलेल्या ११ युवक आणि युवतींची पोलिसांच्या मदतीने सुटका करणाऱ्या शिवसेनेच्या बाळा दराडे यांनी आता पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे या हॉटेलची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी आज (ता.३) निवेदनाद्वारे केली आहे.

परप्रांतीय असल्याने तक्रार नाही

फोनद्वारे आणि अनेक व्हीडिओ मेसेजद्वारे या विद्यार्थ्यांनी आपबिती जाहीर केले आहे. या हॉटेलवर दंडुक्याने मारहाण करणे, डांबून ठेवणे, असे गंभीर आरोप केले आहेत. त्यापैकी एका विद्यार्थिनीने तर दराडे यांच्याशी देखील संपर्क साधून आपली कैफियत मांडली होती. मात्र, परप्रांतीय असल्याने आणि दबावात असल्याने पोलिसांनी विचारल्यानंतर त्यांनी काहीही तक्रार नाही. घरी जायचे आहे, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून याबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी दराडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आता पोलिस आयुक्त या प्रकरणाबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

पुणेकरांनो लक्ष द्या! दिवे घाटातील वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन, पण कधी?

Turkish Airlines Emergency Landing : २३६ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनला अवघ्या काही मिनिटांतच लागली आग!

Latest Marathi News Live Update : लोअर परेलच्या ब्रिजवर भीषण अपघात; बांद्रा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल अंकित सुर्वे जखमी

Financial Horoscope: महाशिवरात्रीनंतरचे सूर्यग्रहण ठरणार लकी! ‘या’ 5 राशींना होणार प्रचंड आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT