nivrutti aher.jpg
nivrutti aher.jpg 
नाशिक

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीची धक्कादायक एक्झिट; खिशातील चिठ्ठीमुळे झाला खुलासा

मोठाभाऊ पगार

देवळा (नाशिक) : ''कर्जाचा बोजा फेडू शकत नसल्याने मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस कुणासही जबाबदार धरू नये.'' अशा आशयाची चिठ्ठी खिशात ठेवत निवृत्ती आहेर यांची धक्कादायक एक्झिट. घटनेने कुटुंबाचा जीवघेणा आक्रोश. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

निवृत्ती राजाराम आहेर (वय ४९) हे देवळा तहसील कार्यालयात झेरॉक्स सेंटरवर काम करून कुटुंबाची उपजीविका भागवित होते. निवृत्ती आहेर त्यांच्या निम गल्ली येथील घरातून बुधवार (ता. १३)पासून बेपत्ता होते, तशी तक्रार त्यांचे बंधू गोरख आहेर यांनी देवळा पोलिसांत दाखल केली होती. शुक्रवारी (ता. १५) सकाळी अकराच्या सुमारास तहसील कार्यालयातील शिपाई प्रशासकीय इमारतीच्या छतावर पाण्याची टाकी भरली का, हे पाहण्यासाठी गेला असता, त्याला एक व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याने त्यांनी देवळा पोलिसांना कळविले. मृत व्यक्ती बेपत्ता असलेले निवृत्ती आहेरच असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले. 

खिशातल्या सुसाईड नोटमुळे खुलासा

निवृत्ती आहेर यांच्या खिशात कर्जाचा बोजा फेडू शकत नसल्याने आत्महत्या करीत आहोत. आपल्या मृत्यूस कुणासही जबाबदार धरू नये, अशा आशयाची चिठ्ठी आढळली. निवृत्ती आहेर ज्या ठिकाणी मृतावस्थेत आढळले तेथे विषाची बाटलीदेखील आढळली. देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निवृत्ती आहेर यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ, मुलगा असा परिवार आहे. देवळा येथील अमरधाममध्ये त्‍यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT