burglary News esakal
नाशिक

Nashik Crime News : देवळाली कॅम्पला अडीच लाखांची घरफोडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिंडोरी रोडवरील व्यापाऱ्याच्या घराचे लॉक तोडून चोरट्यांनी तब्बल ५ लाख ९१ हजारांचा ऐवज चोरून नेला. देवळाली कॅम्प परिसरातील धोंडी रोडवरील बंद घराचे लॉक तोडून चोरट्यांनी २ लाख ३६ हजारांचे ऐवज चोरून नेत घरफोडी केली. दिवाळीच्या सुटीत चोरट्यांची दिवाळी साजरी झाली आहे. (Deolali camp burglary stolen two half lakhs Nashik Latest Crime News)

रोहिंग्टन फरदीन देवळालीवाला (रा. धोंडी रोड, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. २६) दीपावली पाडव्याच्या दिवशीच त्यांच्या बंद घराचे लॉक अज्ञात चोरट्यांनी तोडले. घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, सोन्याची चैन-पेडल, सोन्याचा नेकलेस, बांगड्या, एअर रिंग, अंगठी असा सुमारे २ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक एस. एस. पाडवी तपास करीत आहेत.

दरम्यान, दीपावली पाडव्याच्याच दिवशी दिंडोरी रोडवरील मालती मनोहर अपार्टमेंटमध्ये राहणारे व्यापारी सौरव जवाहर जैन हे कुटुंबीयांसह सायंकाळी बाहेर जेवणासाठी गेले असता, हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून ५ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी अवघ्या तासा- दीड तासात घरफोडी केली. सुरक्षेविषयी निष्काळजीपणा केल्याने त्यातून घरफोडीची घटना घडल्या. यामुळे मात्र चोरट्यांची दिवाळी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT