samruddhi care foundation workers helped elderly man abandoned in rain latest marathi news esakal
नाशिक

Positive News : पावसात भिजणाऱ्या निराधार ज्येष्ठाला ‘समृद्धी’चा आधार

केशव मते

नाशिक : मुसळधार पाऊस (Heavy Rain) अन्‌ गोठवणारी थंडीत (Cold) दिंडोरी रोडवर तारवाला सिग्नल येथे भर पावसात रस्त्याच्या कडेला निराधार ज्येष्ठ नागरिक थंडीने कुडकुडत झोपले होते. अंगावर प्लास्टिक पांघरून फुटपाथवरच ते पडले होते.

मंगळवारी (ता. १२) निराधार ज्येष्ठाला आधार मिळावा म्हणून सागर शेलार, वृक्षवल्ली फाउंडेशनचे तुषार पिंगळे यांनी शहरातील काही वृद्धाश्रमात संपर्क केला गेला. या वेळी रासबिहारी रोडवरील सुखसमृद्धी केअर सेंटरने या बाबांना आधार दिला.

पुरुषोत्तम आव्हाड व टीम मेंबरकडून पावसात भिजलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला रुग्णवाहिकेत बसवून वृद्धाश्रमात आणले. या वेळी बाबांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांचे नाव मारुती विठोबा पवार असून, ते कळवण येथील आहेत. (destitute elders who get wet in rain helped by samruddhi care Latest Marathi News)

माणुसकीचा आधार देत पवार बाबांना तरुणांनी मदत करत वृद्धाश्रमात नेले. येथे सुखसमृध्दी केअर सेंटरचे रोशन जाधव, डॉ. संतोष वैद्य यांनी शुश्रूषा करून त्यांना नवे वस्त्र परिधान केले. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस अन थंडीत असल्याने अनेक निराधार पावसात भिजत आहेत.

त्यांना आधार देण्यासाठी सुखसमृद्धी केअर सेंटरकडून मदत केली जात आहे. कळवण येथील असलेले हे मारुती पवार हे कुणाच्या परिचयाचे असल्यास त्यांनी ९६६५८५६०७८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सुखसमृद्धी केअर सेंटरतर्फे करण्यात आले आहे.

"मारुती पवार बाबांना सर्व प्रकारची मदत करत काळजी घेतली आहे. थंडी, पावसात भिजलेले असल्याने त्यांची शुश्रूषा केली आहे. अशाप्रकारे अनेक ठिकाणी निराधार ज्येष्ठ रस्त्याला झोपलेले दिसतात. या निराधार नागरिकांची माहिती कुणाकडे असल्यास त्यांनी सुखसमृद्धी केअरशी संपर्क करावा. त्या सर्वांना मदत करत आधार दिला जाईल." - डॉ. संतोष वैद्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT